रस्त्यावर राहणाऱ्या बेघर नागरिकांनी त्यांच्या दृष्टीकोनातून मुंबईचे दर्शन घडवणारी “My Mumbai 2025” ही दिनदर्शिका एक अनोखी संकल्पना आहे. पहचान संस्थेच्या या उपक्रमामध्ये ५० बेघर नागरिकांना फिजी कॅमेरे देऊन, त्यांना मुंबईचे फोटो त्यांच्या दृष्टीने टिपण्याची संधी देण्यात आली. एकूण ११०७ छायाचित्रांमधून निवडलेल्या १३ फोटोच्या आधारे ही विशेष दिनदर्शिका तयार करण्यात आली आहे.
या दिनदर्शिकेचे प्रकाशन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृहात पार पडले. या कार्यक्रमाला आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली, पहचान संस्थेचे अध्यक्ष ब्रिजेश आर्य आणि सुभाष रोकडे हे देखील उपस्थित होते. कामगार नेते अभिजीत राणे, सामाजिक कार्यकर्ते रामकुमार पाल आणि लंडन येथील माय वर्ल्ड क्रिएटिव प्रकल्पाचे पॉल रयान यांनी विशेष सहकार्य केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळोवेळी बेघर नागरिकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातील एक भाग म्हणजे मुंबईत रात्रकालीन निवारा बांधण्याचे काम वेगाने सुरू आहे. या उपक्रमातून बेघर नागरिकांच्या कलेला व्यासपीठ मिळाल्याबरोबरच त्यांचे जीवन सुधारण्यासाठीही एक पाऊल पुढे टाकले गेले आहे.
बेघर नागरिकांनी टिपलेल्या सर्व फोटोची छाननी आणि निवड करण्यासाठी नेमलेल्या पॅनेलमध्ये राज्य सनियंत्रण निवारा समितीचे अध्यक्ष उज्वल उके, आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली, ज्येष्ठ फोटोग्राफर प्रशांत नाकवे, डॉ रातूला कुंडू, ब्रिजेश आर्य, सार्थक बनर्जीपुरी यांचा सहभाग होता.
हे ही वाचा:
सरकारने घेतला मोठा निर्णय; आता राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी शिकवणं बंधनकारक…
HMPV Virus Cases : देशात HMPV विषाणूच्या रुग्णांमध्ये झाली वाढ, 30 टक्के प्रकरणे महाराष्ट्रात…