उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना आणखी एक जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. त्याच ईमेल आयडीवरुन पुन्हा एकदा धमकीचा मेला आला आहे. यावेळी त्या व्यक्तीने अंबानींकडे २०० कोटी रुपयांची मागणी केली आहे. मागील ईमेलला प्रतिसाद न दिल्यामुळे ही रक्कम 20 कोटींवरून २०० कोटी रुपये करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
उद्योगपती मुकेश अंबानी यांना 27 ऑक्टोबर रोजी म्हणजेच शुक्रवारी धमकीचा मेल आला होता. या मेलमधून मुकेश अंबानी यांना 20 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. जर पैसे दिले नाही, तर जीवे मारण्याची धमकी अंबानींना देण्यात आली होती.
आताच्या मेलमध्ये काय म्हटलं?
आधीच्या मेलला प्रतिसाद न दिल्यामुळे मुकेश अंबानी यांना पुन्हा एकदा धमकीचा मेल पाठण्यात आलाय. त्यातच आता त्यांच्या 200 कोटींची मागणी करण्यात आलीये. या मेलमध्ये म्हटलयं की, “तुम्ही आमच्या ईमेलला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आता 20 कोटी नाही तर 200 कोटी द्यावे लागतील. अन्यथा तुम्ही तुमच्या डेथ वॉरंटवर सही करत आहात.’
त्यानंतर ऑगस्ट 2022 ला देखील मुकेश अंबानी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. आतंकवादी अफजल गुरु आहे असे सांगून रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन मुकेश धीरूभाई अंबानी आणि त्यांचे दिवंगत वडील धीरूभाई अंबानी यांचे नावाने वारंवार अश्लील भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली गेली होती. या आरोपीने रिलायन्स रुग्णालयात नऊ वेळा कॉल करुन धमकी दिली. त्यानंतर विष्णू बिंदू भूमिक या 56 वर्षीय आरोपीला बोरीवलीमधून ताब्यात घेण्यात आल आहे.
हे ही वाचा :
आता ‘iPhone’ ही होणार ‘मेड इन इंडिया’ (Made in India)
संजय राऊतांनी फडणवीसांनी डिवचलं, मी पुन्हा येईल चं आम्ही सध्या स्वागत करतो कारण…