मुंबईत एलिफंटा परिसरात आज सायंकाळी प्रवासी बोट बुडाल्याची घटना घडली असून त्याबाबतच्या बचावकार्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई शहर, रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतली. नौदल, जेएनपीटी, तटरक्षक दल आणि स्थानिक मच्छीमार बोटींच्या सहाय्याने बचाव कार्याला वेग देण्याचे निर्देश देत सगळ्यांना सुरक्षित बाहेर काढा, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यंत्रणेला सांगितले.
मुंबईसारख्या स्वप्ननगरीत गेटवे ऑफ इंडियाजवळील समुद्रात एक प्रवासी बोट बुडाल्याची घटना आज १८ डिसेंबरला संध्याकाळी ५ च्या सुमारास घडली. ही बोट बुडाली तेव्हा त्यामध्ये अनेक प्रवासी होते. त्यामुळे या घटनेत बरीच जीवितहानी झाली. तसेच यामध्ये जवळपास ८० प्रवाशांपैकी ७३ जणांची सुटका झाली. तर अद्याप ५ ते ६ प्रवासी बेपत्ता आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार ३ जणांचा मृत्यू झाला आहे. अजूनही निश्चित आकडा समोर आलेला नाही. ही प्रवासी बोट गेट वे ऑफ इंडियावरून एलिफंटाच्या दिशेने जात होती. समुद्रात गेल्यावर बोट अचानक बोट बुडाली.
एलिफंटाला जाणाऱ्या फेरीबोटीच्या दुर्घटनेची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री शिंदे यांनी रायगड जिल्हाधिकारी किसन जावळे, मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून बचावकार्याची माहिती घेतली. त्याचबरोबर पोलिस उपआयुक्त (बंदरे) सुधाकर पाठारे यांच्याशीही दूरध्वनीवरून संवाद साधत माहिती घेतली.
हे ही वाचा:
गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटाकडे जाणारी ‘नीलकमल’ प्रवासी बोट पाण्यात उलटली…
अमित शाह यांनी बाबासाहेब आंबेडकरांवर केलेल्या कथित विधानानंतर संसद दणाणली; विरोधक आक्रमक