spot_img
spot_img

Latest Posts

‘नमो एक्सप्रेस’ला देवेंद्र फडणवीसांनी दाखवला भगवा झेंडा…

गणेशोत्सवासाठी सध्या संपूर्ण राज्यात लगबग ही सुरु झाली आहे. तसेच चाकरमान्यांची कोकणात (konkan) जाण्याची लगबग देखील सुरु आहे.

गणेशोत्सवासाठी सध्या संपूर्ण राज्यात लगबग ही सुरु झाली आहे. तसेच चाकरमान्यांची कोकणात (konkan) जाण्याची लगबग देखील सुरु आहे. मुंबई भाजपच्या (Mumbai Bjp) वतीने चाकरमान्यांना कोकणात जाण्यासाठी तीन दिवस सहा विशेष ‘नमो एक्सप्रेस’ची ( Namo Express) व्यवस्था केली आहे. काल दिनांक १५ सप्टेंबर २०२३ रोजी रात्री दादर येथून कोकणात रवाना झाली आहे. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या ट्रेन ला भगवा झेंडा दाखवला. तसेच त्यांच्यासोबत पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार आशिष शेलार उपस्थित होते.

गणेशोत्सवानिमीत्त कोकणात जाणाऱ्या सर्व नागरिकांसाठी ६ ट्रेन आणि ३३८ बस भारतीय जनता पार्टी तर्फे सोडण्यात आल्या आहेत. तसेच आशिष शेलार आणि मंगलप्रभात लोढा यांनी पुढाकार घेऊन चाकरमान्यांसाठी ही व्यवस्था केली आहे. तसेच यावेळी बोलत असताना देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत की, लोकांमधे उत्साह असल्याचे फडणवीस म्हणाले. गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी भाजप दरवर्षीच जास्तीची व्यवस्था करत असते. भाजपला आशीर्वाद मिळत आहे, याचबरोबर आम्ही स्पर्धा भरवत असतो. यात तीन हजार एंट्री आल्या आहेत, त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे फडणवीस म्हणाले. टोल माफी कोकणवासीयांसाठी केली आहे. गोवा हाय वे वर रवींद्र चव्हाण गेले पंचवीस दिवस त्या ठिकाणी आहेत. देशभरातून मशीन आणल्या आहेत. सर्व कंत्राटदारांची मदत करुन काम सुरु केल्याचे फडणवीस म्हणाले.

तसेच यावेळी छत्रपती संभाजीनगरला होणाऱ्या मंत्रीमंडळाच्या बैठकीबाबत देखील फडणवीसांना विचारण्यात आलं. त्यावेळी ते म्हणाले की, आम्ही मराठवाड्याच्या हिताचे निर्णय घेऊ. काही कामं झाली आहेत, तर काही कामं पाईपलाईनमध्ये आहेत. प्रश्न विचारतात त्यांना प्रतिप्रश्न आहे की तुम्ही अडीच वर्ष काय केले माश्या मारल्यात का? असा सवाल करत फडणवीसांनी विरोधकांवर टीका केली. दरम्यान, फाइव्ह स्टार हॉटेलबाबत मला माहीत नाही. आम्ही शासकिय विश्रामगृहात राहतो तिकडेच रहाणार असल्याचं फडणवीसांनी सांगितलं.

हे ही वाचा: 

अंजीर खाण्याचे ‘हे’ आश्चर्यकारक फायदे तुम्हाला माहित आहे का?

तुमच्या घरातील गौरी ला चापूनचोपून साडी नेसवायची? तर या टिप्स नक्की बघा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss