Friday, December 1, 2023

Latest Posts

१७ हजार कोटींचा हिरा व्यापार सूरतला रवाना

रतच्या हिरे व्यापाऱ्यांनी अंदाजे ३४०० कोटी रुपये खर्च करून जगातील सर्वात मोठे हिरे व्यवसाय केंद्र गुजरातमध्ये तयार केले आहे. सूरत डायमंड बुर्स (Surat Diamond Bourse) नावाच्या या डायमंड हबला जगातील सर्वात मोठ्या इमारतीचा खिताबसुद्धा बहाल करण्यात आला आहे,

सूरतच्या हिरे व्यापाऱ्यांनी अंदाजे ३४०० कोटी रुपये खर्च करून जगातील सर्वात मोठे हिरे व्यवसाय केंद्र गुजरातमध्ये तयार केले आहे. सूरत डायमंड बुर्स (Surat Diamond Bourse) नावाच्या या डायमंड हबला जगातील सर्वात मोठ्या इमारतीचा खिताबसुद्धा बहाल करण्यात आला आहे, जो आतापर्यंत अमेरिकेतील पेंटागॉन इमारतीकडे होता. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, गुजरातमध्ये बांधलेल्या सूरत डायमंड बुर्समुळे मुंबई आणि महाराष्ट्र सरकारला कराच्या रूपात मोठा धक्का बसणार आहे, कारण मुंबईत स्थायिक झालेल्या गुजराती हिरे व्यापाऱ्यांनी आपला व्यवसाय बंद करून सूरतच्या दिशेने स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे.

वर्षानुवर्षे सूरत शहराला डायमंड सिटी म्हटले जाते. सूरत शहरातील हिरे कारखान्यांमध्ये बनवलेले हिरे देशातील आणि जगातील विविध देशांमध्ये निर्यात केले जातात. या हिऱ्यांचा व्यवसाय लाखो लोकांना रोजगार देतो. सूरतच्या हिरे कारखान्यांमध्ये तयार करण्यात आलेले हिरे जगातील विविध देशांमध्ये पाठवण्यासाठी मुंबईचा वापर केला जातो. मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळ असल्यामुळे सूरतच्या हिरे व्यापाऱ्यांना मुंबईत स्वतंत्र कार्यालय सुरू करावे लागले. ज्याद्वारे सूरतमध्ये तयार केलेले हिरे मुंबईतून जगातील विविध देशांमध्ये निर्यात केले जात होते.

आता कॉर्पोरेट ऑफिस सुरतमध्येच राहणार
सुरतचे मोठे हिरे व्यापारी असलेले वल्लभभाई लखानी यांनी आपला व्यवसाय पूर्णपणे मुंबईतून स्थलांतरित केला आहे, ते किरण डायमंड एक्सपोर्ट या नावाने देशात आणि जगात हिऱ्यांचा व्यवसाय करतात. वल्लभभाई लखानी यांनी आपले हिरे जगातील देशांना पाठवण्यासाठी गेल्या ३० वर्षांपासून मुंबईत कार्यालय उघडले होते. त्यांच्या कार्यालयात सुमारे २५०० कर्मचाऱ्यांचा ताफा असायचा. सुरतमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ नसल्यामुळे सुरतच्या हिरे व्यापाऱ्यांना परदेशात हिरे पाठवण्यासाठी मुंबईशिवाय दुसरा पर्याय नव्हता.

हे ही वाचा : 

वनिता खरातने दसऱ्यानिमित्त शेअर केलेल्या फोटोवर, हेमांगी कवीची मजेशीर कमेंट

पंतप्रधान मोदींच्या सभेला जाणाऱ्या बसेस अडवून परत पाठवल्या – आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss