spot_img
spot_img

Latest Posts

मुंबईतील Double-decker bus ५ ऑक्टोबरपासून होणार बंद

मुंबई (Mumbai) शहर हे अनेक वर्षांपासून पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. मुंबई शहरात गेट वे ऑफ इंडिया (Gateway of India), राणी ची बाग, मत्सालय (aquarium), सिद्धिविनायाक मंदिर यांसारखी असंख्य पर्यटन स्थळ आहेत.

मुंबई (Mumbai) शहर हे अनेक वर्षांपासून पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. मुंबई शहरात गेट वे ऑफ इंडिया (Gateway of India), राणी ची बाग, मत्सालय (aquarium), सिद्धिविनायाक मंदिर यांसारखी असंख्य पर्यटन स्थळ आहेत. मुंबईच दर्शन करण्यासाठी विदेशी पर्यटक आणि देशभरातील सर्वच जण मुंबई फिरण्यासाठी येतात. त्यात मुंबईच आकर्षण असलेली डबल डेकर ओपन डेक बस (Double Decker Open Deck Bus) आता बंद होणार आहे. ५ ऑक्टोबरपासून ही बस बंद करण्यात येणार आहे. बस प्रशासनाच्या या निर्णयामुळे मुंबईच्या पर्यटनाला मोठा धक्का बसणार आहे. या बस मधून होणारे मुंबईचे दर्शन ५ ऑक्टोबरपासून बंद होणार आहे.

मुंबईच्या पर्यटनाला चालना मिळावी आणि विदेशी पाहुण्यांना मुंबई पाहता यावी म्हणून २६ जानेवारी १९९७ पासून मुंबईमध्ये एमटीडीसीच्या (MTDC) मदतीने ओपन डेक बस सेवा सुरु करण्यात आली. या बस सेवेचा लाभ दर महिन्याला २० हजारापेक्षा जास्त पर्यटक घेत असतात. यामुळे मुंबईच्या पर्यटनाला चालना मिळाली आहे. सध्या बेस्टकडे ३ डबल डेकर बस उपलब्ध आहेत. पण हळू हळू सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात तिन्ही बस बंद करण्याचा निर्णय बेस्टने घेतला आहे. मुंबईतील ही ओपन डेस्क नॉन एसी (Non AC) आहे. या बसमधील अप्पर डेक (Upper deck) आणि लोअर डेक (Lower deck) आहे. यातील दोन्ही डेकचे भाडे वेगवेगळे आहे.या ओपन डेस्क बस मधून संपूर्ण मुंबई फिरता येत होती. जेव्हा ही बस सुरु झाली तेव्हा ती फक्त मुंबईतील पश्चिम उपनगरातील पर्यटनस्थळांना भेट देत होती पण आता काही वर्षपासून ती दक्षिण मुंबईमधील पर्यटन स्थळांना भेट देत आहे. या बसचे कार्यकाळ संपल्यामुळे जुन्या बस काढून टाकण्यात येणार आहेत. ५० नवीन बस खरेदी करण्यासाठी काढलेली निवेदा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या ५ ऑक्टोबरपासून ‘मुंबई दर्शन’ बंद होणार आहे.

मुंबईतील ही डबल डेकर बस एका दिवसामध्ये संपूर्ण मुंबईचे दर्शन करून देत होती. मुंबईत येणाऱ्या पर्यटकांना या बसमधून हुतात्मा चौक, हॉर्निमल सर्कल, आरबीआय, एशियाटिक लायब्ररी, जुनं कस्टम हाऊस, एनसीपीए, मरीन ड्राइव्ह, प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम, मंत्रालय, विधानभवन, सीएसएमटी, बीएमसी , गिरगाव चौपाटी, चर्चगेट स्थानक, ओव्हल मैदान, मुंबई हायकोर्ट आणि मुंबई विद्यापीठ या सर्व ठिकाणाची एका दिवसात सफर करता येते . बेस्ट प्रशासनाच्या या निर्णयामुळे मुंबईतील प्रयत्न व्यवसायाला धक्का बसणार आहे.

Latest Posts

Don't Miss