Wednesday, November 29, 2023

Latest Posts

नशेत कार चालवणं महिलेला पडलं महागात? तीन जणांना…

नशेत कार चालवणं महिलेला पडलं महागात? तीन जणांना...

चेंबूरच्या डायमंड गार्डन जवळ एका महिलेने मद्यधुंद अवस्थेत तिच्या कारने तीन जणांना उडवलं आहे. या धडकेत हे तिघे जण जखमी झाले आहेत. हा सगळा प्रकार मैत्री पार्कवरून चेंबूरच्या दिशेने भरघाव वेगात येताना झाला. या घटनेप्रकरणी चेंबूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर महिला ही व्यवसायाने आर्किटेक असून ती कुर्ल्याची रहिवाशी आहे. मध्यरात्रीच्या सुमारास ती मद्यधुंद अवस्थेत तिची मोटर कार चालवत मैत्री पार्कवरून चेंबूरच्या दिशेन भरधाव वेगात जात होती. ती गाडी बेफाम होऊन चालवत होती, दरम्यान तिची कार डायमंड गार्डनजवळ आली असता महिलेचा गाडीवरचा ताबा सुटला आणि दुचाकीवरून समोर स्कूटीवर असलेल्या जैस्वल कुटुंबाला तिने उडवले. समृद्धी जैस्वाल,हर्ष जैस्वाल दिपू जैस्वाल या तिघांना तिने जोरदार धडक दिली ज्यामुळे हे तिघे गंभीर जखमी झाले असून जवळील झोन हॉस्पिटलमध्ये त्या तिघांवर उपचार चालू आहेत, तर मद्यधुंद असलेल्या महिलेला चेंबूर पोलिसांनी ताब्यात घेतलं असून तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

कारचालक महिला पोलिसांच्या ताब्यात

सदर महिलेवर तिथल्या स्थानिक नागरिकांनी राग व्यक्त करत तिच्यावर मारहाण करायचा प्रयत्न केला पण पोलिसांनी त्यांला रोखले आणि या पुढील तपास आता चेंबूर पोलीस करत आहेत. झालेल्या अपघातानंतर तेथे बरेच लोकं जमले, पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन कारचालक महिलेला ताब्यात घेतलं. चेंबूर परिसरात झालेला अपघात चिंतेची बाब ठरली आहे,त्यामुळे चौकात झालेल्या या अपघातामुळे बेशिस्त वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आलेला आहे. या झालेल्या अपघातामुळे वाहनांची झालेली अवस्था पाहता अपघाताची भीषणता लक्षात येते.

एका टेक कंपनीच्या सीईओचा मृत्यू

आपल्या पतीसोबत वरळी सीफेसवर मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या एका महिलेला भरधाव वेगाने आलेल्या एसयूव्ही गाडीने जोरदार धडक दिली ही धडक इतकी भयानक होती की यामुळे या महिलेचा मृत्य झाला. रविवारी डेअरीजवळ सकाळी सडे सहाच्या दरम्यान हा अपघात झाला अपघातात मृत झालेली महिला ही एका टेक कंपनीची सीईओ होती, राजलक्ष्मी रामकृष्णन असं या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचं नाव आहे.

हे ही वाचा : 

वाढत्या वयाबरोबर ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात, रहाल निरोगी…

सिध्दार्थ घालणार पुन्हा एकदा धिंगाणा !

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss