राज्यभरात सप्टेंबर महिन्यात पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. काही भागात अति मुसळधार तर काही भागात तुरळक प्रमाणात पाऊस पडत आहे. सध्या मुंबईत मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेवरील (Western Railway Route) अनेक एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. पश्चिम रेल्वेच्या काही भागात अति मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबई सेंट्रलहून दिल्ली, गुजरात, राजस्थानसाठी धावणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकांवर मोठा परिणाम झाला आहे. मुंबई सेंट्रल ते हजरत निजामुद्दीन ऑगस्ट क्रांती, तेजस, राजधानी एक्स्प्रेससह एकूण १९ रेल्वेगाड्यांच्या खोळंबा झाला आहे. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.
मुंबई ते दिल्ली दरम्यान पडणाऱ्या पावसाचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर झाला आहे. गोध्रामध्ये पुन्हा मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. गोध्रारेल्वे स्थानकावर मुसळधार पावसामुळे पाणी जमा झाले आहे. याचा परिणाम रेल्वे सेवेवर झाला आहे. इंदूर दोंड अवंतिका एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. राजधानीसह अवध पश्चिम सुवर्ण मंदिर जम्मू तावी एक्सप्रेस ट्रेनचा प्रवासी मार्ग बदलण्यात आला आहे. गोध्रा रेल्वे स्थानकावर रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने प्रवासाचे खूप हाल झाले आहेत. मुंबई आणि दिल्ली दरम्यानच्या ट्रॅकवर पाणी साचल्याने राजधानीसह पॅसेंजर गाड्यांचे मार्ग वळवण्यात आले आहे. तर, काही लोकल मेमू गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
सप्टेंबर महिन्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे सगळीकडे वातावरणात बदल झाला आहे. मुसळधार पावसामुळे रेल्वे मार्गिकांवरून पाणी वाहत असल्याने नियोजित मार्गांवरील रेल्वेगाड्या पश्चिम रेल्वेने भोपाळ-इटारसी-खंडवामार्गे वळविण्याचा निर्णय घेतला.काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही रेल्वे गाड्या उशिराने धावत आहे. यामुळे गणेशोत्सवात प्रवास करणाऱ्या कोकणवासीयांची हाल होत आहे. गाडी क्रमांक १२९५३ मुंबई सेंट्रल-हजरत निजामुद्दीन रविवारी सायंकाळी ५. १० वाजता सुटणार होती.कोकण मार्गावरील गाड्या सहा ते सात तास उशिराने धावत आहेत. गाडी क्रमांक १२९६१ मुंबई सेंट्रल – इंदूर-मुंबई सेंट्रल अवंतिका एक्स्प्रेस, इंदूर-दौंड- इंदूर एक्स्प्रेस, नागदा-रतलाम विशेष रतलाम – उज्जैन विशेष, दाहोद- रतलाम- दाहोद विशेष, रतलाम-नागदा विशेष या रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. १२९३९ पुणे-जयपूर जेसीओ ही गाडी १७ सप्टेंबर रोजी भेस्तान-जळगाव – भुसावळ – इटारसी – भोपाळ – संत हिरदरम नगर नगडा या मार्गावर वळवण्यात आली आहे.
हे ही वाचा:
‘फक्त मराठी सिने सन्मान सोहळा २०२३’ दिमाखात संपन्न, ‘वाळवी’ ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या विधानावरून राजकारण तापण्याची शक्यता