मुंबईमधील मंत्रालयाच्या मुख्य इमारतीत सोमवारी (२९ ऑगस्ट) वर्ध्यातील शेतकऱ्यांकडून आंदोलन करण्यात आले होते. शेतकऱ्याना मंत्रालयातील सुरक्षा जाळीवर उड्या मारल्या. यावेळी पोलिसांनीही त्यांना वाचवण्यासाठी उड्या मारल्या होत्या. या प्रकरणात काही शेतकऱ्यांना पोलिसांकडून ताब्यातही घेण्यात आले होते. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अप्पर वर्धा भागातील शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी मंत्रालयात आंदोलन केले होते. आंदोलन करताना काही शेतकऱ्यांनी मंत्रालयात बसवण्यात आलेल्या सुरक्षा जाळ्यांवर उड्या मारल्या होत्या. या प्रकरणाकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष लक्ष दिले आहे. पत्रकारांशी संवाद साधताना आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “१०-१२ दिवसांनी याबाबत बैठक बोलवण्यात आली आहे. जलसंपदा विभागाच्या सचिवांना सुचना देण्यात आल्या आहेत.त्या शेतकऱ्यांना योग्य तो न्याय दिला जाईल.अप्पर वर्धा धरणग्रस्त शेतकऱ्यांनी मोर्शीच्या तहसिलदार कार्यालयासमोर १०३ दिवस आंदोलन केले होते. मात्र, शेतकऱ्यांच्या आंदोलनाला योग्य वाव मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी थेट मंत्रालयात जाऊन आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. या प्रकरणात १० ते १५ शेतकऱ्यांना आझाद मैदान पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. १९७२मधील प्रकल्पाचा शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाला नाही आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये प्राधान्यही मिळाले नाही.
अप्पर-वर्धा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी मंत्रालयातील सुरक्षा जाळीवर उड्या मारून आंदोलन केलं. ३० हून अधिक शेतकऱ्यांनी मंत्रालयातील सुरक्षा जाळीवर उड्या मारून ‘आम्हाला न्याय द्या’ अशी मागणी सरकारकडे केली. यावेळी मंत्रालयात तैनात असलेल्या पोलिसांची मोठी धावपळ उडाली. यानंतर पोलिसांनी शेतकऱ्यांना ताब्यात घेतलं.धरणग्रस्तांना सरकारने कोणतीही मदत दिली नाही, असं सांगत धरणग्रस्त गेल्या १०५ दिवसांपासून मोर्शीच्या तहसील कार्यालयासमोर आंदोलन करत आहेत. पण, अद्यापही सरकारने आंदोलनाची दखल घेतली नाही. त्यामुळे आज सर्व धरणग्रस्त शेतकऱ्यांनी मंत्रालयात आंदोलन केलं.
हे ही वाचा:
गॅस संदर्भात केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
अंधेरीतील शहाजीराजे भोसले स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जलतरण तलाव आजपासुन सुरु…