येत्या ५ डिसेंबरला महायुती सरकारचा शपथविधी सोहळा आझाद मैदानावर पार पडणार असली तरी राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत अजूनही सुधारलेली नाही. राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती ठीक नसल्याने ते आज ३ डिसेंबरला दुपारी ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल झाले. त्यांच्या ज्युपिटर रुग्णालयात काही चाचण्या करण्यात आल्या. एकनाथ शिंदे ताप, सर्दी, आणि घशाचे इन्फेक्शन झाले आहे. तसेच शरीरातील पांढऱ्या पेशी कमी समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या रक्ताच्या काही तपासण्या केल्यानंतर ते रुग्णालयातून बाहेर पडले. यानंतर ते वर्षा बंगल्याकडे रवाना झाले.
महायुती सरकारच शपथविधी सोहळा ५ डिसेंबरला पार पडणार आहे. देवेंद्र फडणवीस जवळपास मुख्यमंत्री झाल्याचे निश्चित झाले असतानाच मंत्रिपदाची संधी कोणाकोणाला मिळणार याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय वर्षा या निवासस्थानी गिरीश महाजन यांच्यानंतर आता देवेंद्र फडणवीस शिंदेच्या भेटीला आले आहेत.
वर्षावर झालेल्या चर्चेत अनेक इच्छुकांनी मंत्रिपदासाठी आपले नाव सुचवले आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांनी यंदाचे सामंत आणि भाजप नेते गिरीश महाजन यांच्यासोबत आज संभाव्य खाते वाटपावर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. आता वर्षा च्या बंद दरवाजामागे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात नक्की काय चर्चा होणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.
हे ही वाचा: