spot_img
spot_img
Tuesday, October 3, 2023
spot_img
spot_img

Latest Posts

Exclusive : संघटित गुन्हेगारी मोडून काढणारे मुंबई पोलीस Cybercrime विरोधात कंबर कसतायत! CP फणसळकरांचा आशावाद

सेक्सटॉर्शन हा गुन्हेगारीचा प्रकार नव्याने जो येऊ घातला आहे त्यावर तुम्ही काय सांगाल याबाबत विवेक फणसाळकरांनी सांगताना समाजाने देखील याकडे बारकाईने लक्ष दिले पाहिजे,आणि महत्वाचे म्हणजे प्रत्येकाने हे बघितले पाहिजे कि, आधी आपले काही चुकले नाहीये ना. आपली स्वतःची वैयक्तिक चूक नाही आहे ना हे देखील पडताळणे बघितले पाहिजे.

१ सप्टेंबर रोजी संपूर्ण देशातील ६५ बडे नेते एकत्र आले होत त्याचबरोबर उपराष्ट्रपती देखील उपस्थित होत्या आणि त्याच दिवशी संध्याकाळी मराठवाड्यातील जालन्यामध्ये अशा घटना घडली की , ज्यामध्ये पोलिसांवर हल्ला झालेलं आणि त्यावेळे परिस्थिती चिघळतेय की काय असे वाटत होते. परंतु मुंबई पोलीस हा सजक होता आणि आणि हे मुंबई पोलीस ६५ हुन अधिक आलेल्या बड्या नेत्यांच्या सुरक्षिततेचा भाग देखील त्यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला होता. त्यामुळे त्यानेच दिवशी मुंबई पोलिसांना तीन वेगवेगळ्या पण अगदी जबाबदारीची कामगिरी हि त्यांना सोपवण्यात आली होती. आणि महायुती चा देखील सत्ता टिकवण्यासाठी घातलेलं घाट या सगळ्याकडे लागलं होता. त्यामुळेच एकंदर काय तर पोलिसांची जणू काही तारेवरची कसरत चालूच होती. आणि म्हणूनच राज्यातले आणि केंद्रातले असे दोन्ही पोलीस कामाला लागले होते. या सगळ्यांचा प्रतिनिधित्व ज्येष्ठ पोलीस अधिकारी १९८९च्या बॅचचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर हे होते. नेमके एकाच दिवशी या सर्व बड्या नेत्यांनी घातलेला घाट आणि त्यामध्ये पोलिसांची कामगिरी आणि जबाबदारी या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने नेल्या यासंदर्भात जाणून घेणार आहोत.विवेक फणसळकर यांनापोलिसांच्या ड्युटी संदर्भात प्रश्न विचारला असता त्यांनी अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने वर्दीच्या ड्युटीचे मोजमाप करून दाखवले.

सध्या सायबर गुन्हेगारी हि वाढत चालली आहे आणि त्यामुळे सायबर गुन्हेगारीमुळे मुंबईला खूप मोठा धोका किंवा संबंध देशाला सायबर गुहेगारीमुळे धिक संभवत आहे तर त्यावर काय महत्वाच्या उपपाययोजना केल्या आहेत याबाबत सगळ्याच पोलिसांवर ताबा मिळवू शकले नाहीयेत हे हि तितकाच खार आहे तर यावर तुम्ही कसा बघता, सायबर क्राईम हे विश्वाचा इतकाच मोठे झाले आहे की , गुन्हेगारी करणे हे अगदी सोपे झाले आहे. कारण अगदी प्रत्येकाकडे सगळ्याच प्रकारचे ऍक्सेस आले आहेत त्यामुळे मोबाईल, काम्पुटर, टॅब्स आणि इतर गीष्टींमुळे सायकर क्राईम हा वाढलेला आहे आणि तो फोफावत चालला आहे. सायबर क्राईममध्ये सायबरचे जाळे जवळ आले आहे मात्र गुन्हेगार हे लांब चालले आहेत. आणि गुन्हेगार या सायबरच्या जाळ्यात पारंगत असल्याने नवीन विश्वात चॅलेंजिंग आहे. याचबरोबर महत्वाची बाब म्हणजे आताच्या सायबर विश्वात पोलिसांना या संदर्भात योग्य ट्रेनिंग देणे हि काळाची गरज आहे कारण या गोष्टी आत्ताच्या पिढीला सोप्या पद्धतीने चालवता येते मात्र आमच्या पिढीसाठी काहीसे कठीण जाऊ शकत म्हणून त्याचे प्रशिक्षकशन मिळणे हि काळाची गरज आहे असं मला वाटत. यासंबंधी सायबर जगतात अगदी सावधगिरीने वागले आणि राहिले पाहिजे. आपले अज्ञात व्यक्तीसोबत कोणताच आपला डेटा दिला गेला नाही पाहिजे . बँकांच्या संबंधी देखील आपण जागरूकता ठेवली पाहिजे. OTP कधीच अज्ञात व्यक्तींना शेअर करू नये. आपल्या नागरिकांनी जागरूक होऊन स्वतःच्या महत्वाच्या बाबींकडे लक्ष दिले पाहिजे.

सेक्सटॉर्शन हा गुन्हेगारीचा प्रकार नव्याने जो येऊ घातला आहे त्यावर तुम्ही काय सांगाल याबाबत विवेक फणसाळकरांनी सांगताना समाजाने देखील याकडे बारकाईने लक्ष दिले पाहिजे,आणि महत्वाचे म्हणजे प्रत्येकाने हे बघितले पाहिजे कि, आधी आपले काही चुकले नाहीये ना. आपली स्वतःची वैयक्तिक चूक नाही आहे ना हे देखील पडताळणे बघितले पाहिजे. अनोळख्या व्यक्तीशी हितगुज साधणे टाळले पाहिजे. २९ जून २०२२ रोजीउधव ठाकरे यांनी तुमच्या फाईलवर केलेली सही ते आताच २९जून २०२३ या १ वर्षाच्या काळात तब्ब्ल ७०१ वेगवेगळी आंदोलने झाली. आणि आत्ताचा येऊ घातलेला हिंदू धर्मियांचा गणेशोत्सव आणि त्यानंतर येऊ घालणारा मुस्लिम बांधवांचा ईद हा सण याकडे कसे बघता यावर विवेक सरानी अगदी परखडपणे सांगितले की या सगळ्यात आमची कसोटी हि असतेच. कर्ण कोणत्याही राजकीय पक्षाचा कार्यक्रम असो अथवा कोणताही धर्मियांचा सण , उत्सव असो राज्यात , देशात शांतता , सुव्यवस्था राखावी यासाठी मुंबई पोलीस कायम तत्पर असते आणि कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून नेहमीच प्रयत्नशील असते. रोजचा दिवस हा कसोटीचा काळ असतो. त्याचबरोबर कोविडच्या काळात पोलीस भरती हि झाली नाही . मात्र त्यामुळे मनुष्यबळ हे फार कमी झाल. आणि त्यामुळे जवळपास १२००० मनुष्यबळ काम आहे. तरी देखील मुंबई पोलीस त्यांची कामगिरी अगदी योग्य पद्धतीने निभावत आहे. मुंबई पोलीस दलाच्या समोरची मोठी समस्या तुम्हाला प्रमुख म्हणूनकाय वाटते यावर क्षणाचाही विलंब न करता ते म्हणाले, मुंबई हे दहशवादाचे टार्गेटवर असलेले शहर आहे आणि म्हणूनच दहशतवादी हल्ला पासून आम्ही कसे अलर्ट राहू याकडे आमचे कायम लक्ष लागलेले असते तसेच कायदा व सुव्यवस्था तसेच गुन्हेगारीला आळा घालणे त्याचबरोबर महिलांची सुरक्षितता हे आमच्या समोरचे चॅलेंजेस आहे असे समजतो. आणि त्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील असतो.

हे ही वाचा: 

Exclusive : CP Vivek Phansalkar सरकारने मुंबई पोलीसांच्या घरांसाठी आणि Better Life साठी सुरू केलेत जोरदार प्रयत्न

Exclusive : CP Vivek Phansalkar आठ तासांची पोलीस ड्युटी ही सुखावणारी संकल्पना मुंबईत अशक्य!

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss