spot_img
spot_img

Latest Posts

Exclusive : CP Vivek Phansalkar सरकारने मुंबई पोलीसांच्या घरांसाठी आणि Better Life साठी सुरू केलेत जोरदार प्रयत्न

मुंबई पोलिसांच्या घरांच्या विषयी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेत मुंबई पोलिसांच्या घरांचा विषय हा लावून धरलेला आहे असा वक्तव्य केले आहे. त्यानं सांगताना मुलुंड येथे तब्ब्ल ३५ मजली अशी जवळपास ९०० कोरटर्सची बिल्डिंग बांधण्यात येत आहे.

१ सप्टेंबर रोजी संपूर्ण देशातील ६५ बडे नेते एकत्र आले होत त्याचबरोबर उपराष्ट्रपती देखील उपस्थित होत्या आणि त्याच दिवशी संध्याकाळी मराठवाड्यातील जालन्यामध्ये अशा घटना घडली की , ज्यामध्ये पोलिसांवर हल्ला झालेलं आणि त्यावेळे परिस्थिती चिघळतेय की काय असे वाटत होते. परंतु मुंबई पोलीस हा सजक होता आणि आणि हे मुंबई पोलीस ६५ हुन अधिक आलेल्या बड्या नेत्यांच्या सुरक्षिततेचा भाग देखील त्यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला होता. त्यामुळे त्यानेच दिवशी मुंबई पोलिसांना तीन वेगवेगळ्या पण अगदी जबाबदारीची कामगिरी हि त्यांना सोपवण्यात आली होती. आणि महायुती चा देखील सत्ता टिकवण्यासाठी घातलेलं घाट या सगळ्याकडे लागलं होता. त्यामुळेच एकंदर काय तर पोलिसांची जणू काही तारेवरची कसरत चालूच होती. आणि म्हणूनच राज्यातले आणि केंद्रातले असे दोन्ही पोलीस कामाला लागले होते. या सगळ्यांचा प्रतिनिधित्व ज्येष्ठ पोलीस अधिकारी १९८९च्या बॅचचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर हे होते. नेमके एकाच दिवशी या सर्व बड्या नेत्यांनी घातलेला घाट आणि त्यामध्ये पोलिसांची कामगिरी आणि जबाबदारी या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने नेल्या यासंदर्भात जाणून घेणार आहोत.विवेक फणसळकर यांनापोलिसांच्या ड्युटी संदर्भात प्रश्न विचारला असता त्यांनी अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने वर्दीच्या ड्युटीचे मोजमाप करून दाखवले.

मुंबई पोलिसांच्या घरांच्या विषयी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेत मुंबई पोलिसांच्या घरांचा विषय हा लावून धरलेला आहे असा वक्तव्य केले आहे. त्यानं सांगताना मुलुंड येथे तब्ब्ल ३५ मजली अशी जवळपास ९०० कोरटर्सची बिल्डिंग बांधण्यात येत आहे. त्यामध्ये कॉन्स्टेबल्स साठी २BHK चे फ्लॅट उपलब्ध तर मरोळ मध्ये ४०० ते ४५० चे फ्लॅट्स आणिजवळपास १५०० ते २००० फ्लॅट्सचे नवीन फ्लॅट्सचे काम चालू आणि ते लवकरच पूर्णत्वास जाणार असा मला विश्वास आहे. म्हाडाच्या घरांसंबंधी देखील हौसिंग सो. संबंधी आमच्या पोलीस दलाला नवीन आणि चांगले हेकोर्टर्स मिळाले पाहिजे अशी मागणी देखील विवेक फणसाळकर यांनी केली आहे. पोलीस खात्यातल्या अगदी आपण बघितले तर ४० टक्के पोलिसांच्या घराच्या संदर्भातील प्रश्न हा प्रलंबित आहे . हा घरांचा प्रश्न कधी मार्गी लागेल असे तुमहाला वाटते यावर विवेक फणसळकर यांनी सांगितले की , पहिले म्हणजे मोठ्या हुद्द्यावर असणाऱ्या लोकांना बंगलो किंवा घरे ही दिली जातात. मात्र खालच्या पोलीस विभागातील जे काही पोलीस असतात त्यांना मात्र मेंटेनन्स चा समस्या बऱ्याच वेळा भासत असतो. आणि त्याचे दुःख मला देखील वारंवार होत आहे. आणि त्यांचे दुःख मी समूजु शकतो असे ते म्हणाले.

आम्हला जे दिलेले कोर्टर्स आहेत ते PWD डिपार्टमेंट कडून होत असते. आणि काही फंड्स द्वारे देखील दिले जातात. पोलीस दलामध्ये संख्याबळ जास्त असल्याने या सर्व गोष्टी हळूहळू टप्याने या होत असतात. आपल्याला दलाला मिळालेले जे काही कोर्टर्स आहेत ते पूर्वीच्या म्हाडाच्या वसाहतींचे आहेत. त्या महडच्या वसाहती या म्हाडाने विकत घेतअसल्याने त्यांचे मेंटेनन्स च्या समस्या देखील आहेत. त्यासंदर्भात म्हाडाजवळ आमचे पत्रव्यवहार हे चालू आहेत. म्हाडाचे जे काही कोर्टर्स आहेत त्याबदल्यात नवीन ५५०० ते ६००० कोर्टर्स नव्याने बांधण्याचा आमहा मानस आहे आणि आम्ही त्यासाठी प्रयत्नशील आहोत असे विवेक फणसळकर म्हणाले. म्हाडाच्या २९ भूखंडबाबत फणसाळकर म्हणाले कि, यासंदर्भात देखील सरकारचे लक्ष आहे. आणि त्यासंबधी पत्रव्यवहार चालू असून म्हाडासारख्या मोठ्या हौसिंग कंपनी सोबत आम्हाला पुनर्विकास करावा लागणार आहे असे त्यांनी सांगितले. आमच्या पोलिअन नवीन आणि चांगले कोर्टर्स मिळाले पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि त्यासाठी शाहसन देखील प्रयत्नशील आहे .

हे ही वाचा: 

Exclusive : CP Vivek Phansalkar आठ तासांची पोलीस ड्युटी ही सुखावणारी संकल्पना मुंबईत अशक्य!

Exclusive, CP Vivek Phansalkar: प्रत्येक क्षणाला सुरु असते मुंबई पोलिसांची कसोटी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss