मुंबई दहशतवादी हल्यातील प्रमुख आरोपी राहिलेल्या तहव्वूर राणाचे अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण होणे, हे भारताचे कुट नितीमधील मोठे यश आहे. तसेच अमेरिकेत राहून कोणालाही दहशतवादी कृत्य करणाऱ्याची गय केली जाणार नाही, हे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तहव्वूर राणाच्या प्रत्यारपणातून जगाला दाखवून दिले आहे. राणाने शिकागो न्यायालयाने आपल्याला भारतात केलेल्या कृत्याबद्दल अगोदर आपल्याला शिक्षा ठोठावली असल्याने आपल्या भारतात पाठविण्यात येऊ नये, अशी मागणी अमेरिकन न्यायालयात केली होती, मात्र अमेरिकेने यामध्ये सखोल तपास करत तहव्वूर राणाच्या म्हणण्यात तथ्य नसल्याचे लक्षात घेत, त्याला भारतात प्रत्यार्पण करण्यास परवानगी दिली आहे, ही भारतासाठी मोठी गोष्ट आहे.
तहव्वूर राणा आणि डेव्हिड हेडली हे एकाच माळेचे मणी असल्याने, तहव्वूर राणा आणि डेव्हिड हेडलीचे पाकच्या आयएसआय संघटनेशी कसे संबंध राहिले आहेत, यावर तहव्वूर राणा भारतात आल्याने, त्यावर प्रकाश पडण्याची शक्यता असल्याचं विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी म्हटले आहे.
२००८ मध्ये मुंबईतील दहशतवादी हल्ल्यात १७५ लोकांचा मृत्यू झाला होता. या दहशतवादी हल्ल्यात तहव्वूर राणाचा सहभाग असल्याचा आरोप आहे. भारत आणि अमेरिकेत १९९७ च्या प्रत्यार्पण करारानुसार राणाचे प्रत्यार्पण होणार होते. राणा हा पाकिस्थानी सैन्यदलाचा माजी डॉक्टर असून त्याने कॅनडामध्ये स्थलांतरित झाल्यानंतर इमिग्रेशन सेवा सुरु केली. अमेरिकेने यापूर्वी २६/११ मधील आरोपी डेव्हिड हेडली आणि दाऊद गिलानी यांच्या प्रत्यार्पणाला नकार दिला होता. त्यामुळे रंगाचे प्रत्यार्पण भारतासाठी काही प्रमाणात दिलासादायक असणार आहे.
हे ही वाचा :
एस. टी च्या टप्पा वाहतूक सेवेची १४.९५ टक्के भाडेवाढ करण्यास मान्यता