मुंबई सारख्या शहरात अनेक तरुण तरुणी रोजगारासाठी येतात. त्यांच्या घरापासून लांब ते मुंबईमध्ये नोकरी करण्याचा निर्णय घेतात. त्यानिमित्ताने अनेक तरुण तरुणींमध्ये मैत्री होते आणि त्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात होते. या प्रेमातूनच अंगाला शहारे येतील अशा घटना घडतात. अशातच शहरात राहणाऱ्या एका तरुणीने टोकाचं पाऊल उचलून सर्वांनाच हादरवून ठेवलं. एअर इंडियासाठी काम करणाऱ्या एका २५ वर्षीय महिला वैमानिकाने मुंबईतील आपल्या राहत्या घरी डेटा केबलचा वापर करत गळफास लावून घेत आयुष्य संपवले.
मुंबईच्या मरोळ भागामध्ये असणाऱ्या कनकिया रेन फॉरेस्ट नावाच्या इमारतीमध्ये ही तरुणी राहत होती. या तरुणीचे नाव सृष्टी तुली असे असून तिने टोकाचे पाऊल उचलण्याची घटना घडली आहे. पोलिसांनी या घटनेसंदर्भात तपास हाती घेत तरुणीच्या प्रियकरावर आयुष्य संपवण्यासाठी प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटकेची कारवाई करण्यात आली आहे.
गोरखपूर येथील सृष्टीची आदित्य सोबत दिल्लीत ओळख झाली. आदित्य पायलटच्या परीक्षेत अपयशी ठरला होता. याच नैराश्येतून आदित्य नेहमी सृष्टीचा मानसिक छळ करत होता. गेल्या काही दिवसांपासून आदित्य हा सृष्टीच्या घरी वारंवार येत होता. रविवारी रात्री एक सुमारास सृष्टी आणि आदित्य यांच्यात वाद झाला. त्यानंतर आदित्य मुंबई सोडून दिल्लीला रवाना झाला. त्यांनतर सृष्टीने त्याला फोन करून आपण आत्महत्या करत असल्याचे सांगितले, पण आदित्यने घरी परत येण्यास नकार दिला, पण काही वेळाने आदित्य घरी परतला तेव्हा सृष्टीच्या घराचा दरवाजा बंद होता.
घरातून सृष्टीचा कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. आदित्यने चावी तयार करणाऱ्याच्या मदतीने चावी बनवून दरवाजा उघडला. यानंतर घरात प्रवेश केल्यावर सृष्टीने गळफास घेतल्याचे समोर आले. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले पण तिचा आधीच मृत्यू झाला होता. सृष्टीच्या कुटुंबीयांच्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी आदित्य विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी आदित्यला अटक केली.
हे ही वाचा:
Eknath Shinde यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा पालकमंत्री ?
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.