Saturday, June 3, 2023

Latest Posts

माजी मुख्यमंत्री Manohar Joshi हिंदुजा रुग्णालयात दाखल, प्रकृती खालावली

राजकीय वर्तुळातील एक मोठी बातमी समोर येत आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी (Manohar Joshi) यांची प्रकृती ही खालावली आहे.

राजकीय वर्तुळातील एक मोठी बातमी समोर येत आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी (Manohar Joshi) यांची प्रकृती ही खालावली आहे. यांच्यावर मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काल रात्री मनोहर जोशी यांना अस्वस्थ वाटू लागले होते. त्यानंतर त्यांना अचानक माहीमच्या हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मनोहर जोशी यांना आज अचानक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मनोहर जोशी (८६) यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. सध्या त्यांच्या प्रकृतीबाबत रुग्णालयाकडून कोणतेही बुलेटिन जारी करण्यात आलेले नाही. मनोहर जोशी यांच्यावर आयसीयु मध्ये उपचार सुरू आहेत अशी माहिती मिळते. थोड्याच वेळात हिंदुजा रुग्णालयाकडून अधिकृत माहिती देखील दिली जाणार आहे. दरम्यान, जोशी यांची विचारपूस करण्यासाठी उद्धव आणि रश्मी ठाकरे हिंदुजा रुग्णालयात गेले होते. मनोहर जोशी यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्यांना तातडीने हिंदुजा रुग्णालयात (Hinduja Hospital Mumbai) दाखल करण्याात आले. मनोहर जोशी यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे समजते. हिंदुजा रुग्णालयताली डॉक्टरांकडून लवकरच मनोहर जोशी यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली जाईल.

गेल्या काही काळापासून ते राजकारणात सक्रिय नव्हते. मनोहर जोशी यांनी मुंबई महापालिकेचे नगरसेवक, महापौर, विधान परिषदेचे सदस्य, आमदार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री (Former CM) , खासदार, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री, लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य पदही भुषविले होते. तसेच काही वेळापूर्वीच उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. थोड्या वेळापूर्वीच उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे हे हिंदुजा रुग्णालयातून बाहेर पडले आहेत. तर जोशी हे बाळासाहेब ठाकरे यांच्या निकटवर्तीयांपैकी एक होते. शिवसेनेकडून विधानपरिषदेवर निवडून येऊन त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. १९७६ ते १९७७ या काळात त्यांनी मुंबईचे महापौरपदही भूषवले. १९९५ मध्ये शिवसेना-भाजप युती सत्तेवर आल्यावर जोशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यांनी यापूर्वी लोकसभा अध्यक्षपदही भूषवले आहे. मात्र, गेल्या काही काळापासून ते राजकारणात सक्रिय नाहीत.

हे ही वाचा:

मोठी बातमी! मी मुंबईत बॉम्बस्फोट…, ट्विटरवरून दिली धमकी

राज्यात २ भीषण अपघातांची नोंद, लग्नावरुन परतताना Amravati जवळ अपघात, ५ जणांचा मृत्यू

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss