spot_img
spot_img

Latest Posts

१ सप्टेंबर पासून मुंबईमध्ये दुधाच्या दरात होणार एवढ्या रुपयांनी वाढ

सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका सर्व सामान्या जनतेला बसला आहे. या वाढत्या महागाईमुळे सगळ्यांचं आर्थिक बजेट कोलमडले आहे.

सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका सर्व सामान्या जनतेला बसला आहे. या वाढत्या महागाईमुळे सगळ्यांचं आर्थिक बजेट कोलमडले आहे. राज्यभरात डाळीचे भाव वाढल्यांनंतर आता दुधाच्या दारातही मोठी वाढ झाली आहे. सणासुदीच्या तोंडावर सर्वच गोष्टींमध्ये वाढ झाल्यामुळे सर्वसामान्यांना धक्का बसला आहे. म्हशीच्या दुधावर २ रुपयांनी वाढ झाली आहे. मुंबई उत्पादक संघटनेने १ सप्टेंबर पासून दुधाच्या दारात मोठी वाढ केली आहे. म्हशीच्या दुधाचे घाऊक दर ८५ रुपये लिटर वरून ८७ रुपये लिटर होणार आहे. त्यामुळे दुधाचे हे वाढते दर आजपासून लागू होतील.

शनिवारी मुंबई दूध उत्पादक संघ यामधील ७०० संघांची बैठक घेण्यात आली. यामध्ये जनावरांचा चारा आणि खाद्यची किंमत वाढल्यामुळे दुधाच्या दरात वाढ करण्यात आली आहे. दुधाचे हे दर १ सप्टेंबर २०२३ पासून लागू होतील.या वाढत्या किमतीमुळे म्हशीच्या किरकोळ दूध दरात २ ते ३ रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे. तर घाऊक दरात २ रुपयांनी वाढ होणार आहे.

मुंबई मधील या बैठकीत ७०० हुन अधिक डेरी मालक आणि ५० हजाराहून म्हशींचे मालक आले होते. यामध्ये जनावरांच्या चारा आणि आहाराच्या किमतीत वाढ झाल्यामुळे दूध दर वाढले आहे. मागच्या काही वर्षांमध्ये जनावरांच्या चाऱ्यात २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळे दुधाचे दार वाढले आहे. मुंबईमध्ये सणासुदीच्या तोंडावर दुधाचे दर वाढले आहेत. या सणाच्या वेळी घरी गोड मिठाई आणि दुधाचा वापर केला जातो. या वाढत्या महागाईचा परिणाम सर्व सामन्याच्या खिशावर होणार आहे. घाऊक दरात वाढ झाल्यामुळे किरकोळ बाजारात म्हशीचे दूध ९० ते ९५ रुपये प्रतिलिटर होण्याचा अंदाज आहे.

Latest Posts

Don't Miss