spot_img
spot_img
Wednesday, October 4, 2023
spot_img
spot_img

Latest Posts

सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची फसवणूक करणाऱ्या टोळीला बांगलादेश मधून अटक

सिद्धिविनायक(Siddhivinayak) मंदिरात भविकांची फसवणूक करण्याऱ्या सुपर्नो प्रदीप सरकार (Superno Pradeep Sarkar) याला दादर (Dadar) पोलिसांनी बांगलादेश (Bangladesh) मधून अटक केली आहे.

सिद्धिविनायक(Siddhivinayak) मंदिरात भविकांची फसवणूक करण्याऱ्या सुपर्नो प्रदीप सरकार (Superno Pradeep Sarkar) याला दादर (Dadar) पोलिसांनी बांगलादेश (Bangladesh) मधून अटक केली आहे. ऑनलाईन (Online) दर्शन आणि पूजा करण्याच्या बहाण्याने भाविकांची फसवणूक करण्याच्या गुह्यात अटक करण्यात आली आहे. त्यासाठी भाविकांकडून ७०१ ते २१०० हजार रुपये घ्याचे. भाविकांची फसवणूक करून घेतलेले पैसे ज्या बँक खात्यामध्ये वळवले आहे ते गव्हर्मेंटचे (Government) असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या अहवालनुसार ऑनलाइन दर्शन देण्याच्या बहाण्याने भाविकांकडून ७०१ ते २१००० रुपये आकारण्यात येत होते. दादर पोलीस ठाण्यात आत्ता सुब्रजित बसू, प्राजक्ता सामाता आणि अनिता डे या सुपर्नोच्या जोडीदाराचा शोध घेण्यात येत आहे. सिद्धिविनायक मंदिराचा ट्रस्टने पोलीस कंप्लेंट केल्यानांतर हा गुन्हा उघडकीस आला आहे.

सिद्धिविनायक मंदिराचा ट्रस्टीसोबत पेडर रोड येथील एका महिलेने संपर्क साधला आणि २१००० हजार रुपयांची फसवणूक झाली आहे असे सांगितले. तिच्या वडिलांना ब्रीच कँडी (Breach candy) हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते आणि तिला तिचा वडिलांसाठी प्रार्थना करायची होती म्हणून तिने उत्सव अॅपद्वारे ऑनलाईन पूजा बुक केली. त्याच वेळात काही भाविक मंदिरात प्रसाद मागणीसाठी आले होते. त्यांना पैशाबाबत विचारण्यात आले तेव्हा त्यांनी सांगितले की ऑनलाइन अँपद्वारे बुकिंग आणि पूजा केली होती आणि प्रसाद मंदिरात मिळेल असे सांगण्यात आले. या प्रसादासाठी पैसे ऑनलाइन पाठवले आहेत असे भाविकांनी सांगितले. याप्रकारच्या आणखी काही तक्रारी मंदिराकडे आल्या आहेत. दादर पोलिसात तक्रार केल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे.


सिद्धिविनायक ट्रस्टच्या माध्यमातून आदेश बांदेकर (Adesh Bandekar) यांनी कारवाई नंतर पोलिसांचे आभार मानले. तसेच त्यांनी सोशल मीडियाद्वारे नागरिकांना आवाहन केले की कोणत्याही ॲपच्या माध्यमातून बुकिंग करू नये. बुकिंग करताना सिद्धीविनायक मंदिर संस्थानाच्या संकेतस्थळा भेट द्या.

हे ही वाचा:

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणेकरांसाठी आनंदाची बातमी घोषित, गणेशोत्सव मंडळांसोबत…

नितेश राणे यांनी केला ठाकरे सरकारवर मोठा आरोप

पुण्यातील शिक्षिका मृणाल गांजाळे यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss