Wednesday, June 7, 2023

Latest Posts

उद्या घराबाहेर पडणार आहात? तब्ब्ल १४ तासांचा आहे पॉवर ब्लॉक

मुंबई लोकल म्हणजेच मुंबईकरांची जीवन वाहिनी आहे. जर लोकलच्या वेळापत्रकात अचानक जरा जरी बदल झाला तर लाखो मुंबईकरांची दिनचर्या खोळंबतेच.

मुंबई लोकल म्हणजेच मुंबईकरांची जीवन वाहिनी आहे. जर लोकलच्या वेळापत्रकात अचानक जरा जरी बदल झाला तर लाखो मुंबईकरांची दिनचर्या खोळंबतेच. त्यामुळे मुंबईकरांसाठी ही अत्यंत महत्वाची बातमी आहे. जर तुम्हाला उद्या दिनांक २१ मे (रविवार) रोजी लोकल ट्रेनने प्रवास करायचा असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. जर उद्या तुम्हाला कुठे फिरायला जायचे असेल तर त्याच नियोजन हे आजच करा. कारण मुंबई लोकलच्या हार्बर मार्गावर (Harbour Line) विशेष पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. शनिवारी आणि रविवारी असा दोन दिवसांत हा १४ तासांचा विशेष पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे.

उद्या जोगेश्वरी (Jogeshwari) आणि गोरेगाव (Goregaon) या स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन अश्या दोन्ही मार्गावर मध्यरात्री १२ ते दुपारी २ वाजेपर्यंत विशेष मेगाब्लॉक (Special Megablock) हा असणार आहे. जोगेश्वरी आणि गोरेगावदरम्यान पुलाच्या कामासाठी हा पॉवर ब्लॉक जाहीर केला आहे. त्यामुळे हार्बर मार्गावरील वांद्रे (Bandra) आणि गोरेगावदरम्यान (Goregaon) काही अप आणि डाऊन लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. तसेच लांब पल्ल्याच्या काही गाड्या देखील रद्द करण्यात आल्या आहेत.

वांद्रे आणि गोरेगाव दरम्यान हार्बर लाईनवरून तुम्हला प्रवास करायचा असेल तर हे वेळापत्रकी तुम्ही नक्की बघा. शनिवारी रात्री ११. ५५ ते रविवारी दुपारी १.५५ वाजेपर्यंत वांद्रे ते गोरेगाव हार्बर मार्गावरील डाऊन लोकल फेऱ्या रद्द राहतील. तर अप मार्गावरील फेऱ्या या शनिवारी रात्री ११.३३ ते रविवारी दुपारी २.०५ वाजेपर्यंत रद्द राहतील.

तुम्ही जर पश्चिम रेल्वेने प्रवास करणार असाल तर, पश्चिम रेल्वे वरील अप-डाऊन लोकल फेऱ्या अंधेरी ते गोरेगाव दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. तसेच मध्य रेल्वेवरील हार्बर मार्गावरील सर्व लोकल फेऱ्या वांद्रे स्थानकापर्यंतच चालवण्यात येणार आहेत. तर चर्चगेट-बोरिवलीदरम्यान धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या अंधेरी स्थानकापर्यंतच चालवण्यात येणार आहेत. पुढे अंधेरी रेल्वे स्थानकातूनच चर्चगेट-बोरिवली दरम्यान लोकल रवाना होतील. तर चर्चगेट ते विरार दरम्यान अतिरिक्त लोकल चालवण्यात येणार आहे.

तर दुसरीकडे डाउन हार्बर मार्गावर (बेलापूर/नेरुळ – खारकोपर मार्ग वगळून) पनवेल येथून सकाळी १०. ३३ ते दुपारी ३.४९ वाजेपर्यंत सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर मेगा ब्लॉक असेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 या वेळेत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.पनवेल येथून सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ वाजेपर्यंत सुटणारी ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत पनवेल करीता जाणारी डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. या ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई- वाशी भागात विशेष लोकल धावतील. तसेच ब्लॉक कालावधीत ठाणे – वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असतील. बेलापूर – खारकोपर आणि नेरुळ – खारकोपर दरम्यान लोकल ट्रेन वेळापत्रकानुसार धावतील.

हे ही वाचा:

Adipurush चित्रपटातील Jai Shri Ram गाणं आलं प्रेक्षकांच्या भेटीस

Time maharashtra exclusive : निधी खेचून आणणे हे त्या प्रतिनिधींच्या स्किल्सवर अवलंबलेले, बघूया नेमकं काय म्हणाले Milind Patankar

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss