spot_img
spot_img

Latest Posts

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर साडेचार कोटी रुपयांचं सोनं जप्त

विमानतळ मार्गाने मोठ्या प्रमाणावर तस्करी होण्याचे प्रमाण वाढले आहे. वेगवेगळ्या देशातून येणाऱ्या नागरिकांकडून ड्रग्स (drugs) , कोकेनची (Cocaine) तस्करी केली जाते.

विमानतळ मार्गाने मोठ्या प्रमाणावर तस्करी होण्याचे प्रमाण वाढले आहे. वेगवेगळ्या देशातून येणाऱ्या नागरिकांकडून ड्रग्स (drugs) , कोकेनची (Cocaine) तस्करी केली जाते. अशीच एक कारवाई दुबई ते मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर करण्यात आली आहे. सोन्याची तस्करी करणाऱ्या मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. या आरोपीकडून जवळपास साडे चार कोटी रुपयांचं सोन जप्त करण्यात आले आहे. डीआरआयने ही मोठी कारवाई केली आहे. सलीम सगीर इनामदार (43 वर्षे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो मूळचा रायगड मधील रहिवासी असून सिंडिकेटचा मास्टरमाईंड असल्याचे सांगण्यात आले आहे.

दुबईतील सोन्याची तस्करी करण्यासाठी दुबई ते मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत तस्करी करण्यासाठी सिंडिकेट कार्यरत होते. ही सोन्याची तस्करी करण्यासाठी एका व्यक्तीवर विमानात प्रवास करून मुंबईला पोहोचण्याची जबाबदारी होती. त्यानंतर तो प्रवाशी आपल्या सीटवर ते सोने ठेवायचा आणि निघून जायचा. नंतर एका एअरलाईन्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने मुंबई विमानतळाबाहेर त्याची तस्करी केली जात होती. डीआरआयच्या सूत्रांनी सांगितले की त्यांनी विमानतळाबाहेर डिलिव्हरी घेणाऱ्या व्यक्तीलाही अटक करण्यात आली आहे. या सर्व प्रकरणाचा शोध डीआरआय पोलीस घेत आहेत. सलीम हा पॅसेंजर, एअरलाइन्स कंपनीच्या कर्मचारी व सोने वितळणारे यांच्यात अरेंजमेंट व कॉर्डिनेशन करत होता. काही दिवसांपूर्वी डीआरआयने एका एअरलाइन्स कंपनीच्या कर्मचाऱ्यासह सहा जणांना अटक केली होती. आंतरराष्ट्रीय सोन्याची तस्करी करणाऱ्या सिंडिकेटचा पर्दाफाश केले होते. यावेळी सुमारे ७. ४ किलोग्राम सोने जप्त केले असून त्याची किंमत ४.५१ कोटी रुपये आहे. विमानतळावर तस्करी होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.

दररोज एअरलाईन्स मधील प्रवासी ४ ते ५ किलो सोन्याची तस्करी मुंबईमध्ये आणून करत होते. सिंडिकेटला दर महिन्याला २०० कोटी किलोचा पुरवठा करत असल्याचा संशय व्यक्त केला जाते आहे. डीआरआय अधिकाऱ्याने न्यायालयाला सांगितले की त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर कार्यरत असलेल्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश करायचा आहे. एवढ्या मोठया प्रमाणावर सोन्याची तस्करी केली जात आहे.

हे ही वाचा: 

उपोषण सोडताना जरांगेंच्या मंचावर ‘हे’ नेते होते उपस्थित

बैलपोळा सणावर लम्पी आजाराचे सावट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss