मुंबई सारख्या स्वप्ननगरीत आपलं स्वतःचे हक्काचे घर असावे असे प्रत्येक मुंबईकरांना वाटत असते. त्यासाठी लोक जीवाचं रान करतात, खूप कष्ट घेतात. मुंबईकरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडा तसेच सिडको यांच्यातर्फे मुंबई आणि उपनगरात घरांची बांधणी करून त्यांची कमी किमतीत विक्री केली जात आहे. सामान्यांना परवडतील अशी घरे बांधून ती या संस्थेतर्फे विकली जातात. गेल्या काही दिवसांपासून सिडकोच्या घरांची विक्री करण्याची प्रक्रिया चालू झाली आहे. मात्र सिडकोची घरे महाग असल्याच्या तक्रारी सामान्यांकडून केल्या जात होत्या. त्यावरच आता सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यांनी मोठी बातमी दिली आहे. त्यांनी येणाऱ्या काही दिवसांत स्वस्त होणार असल्याचे संकेत दिले आहेत.
संजय शिरसाट यांनी सिडकोच्या घरांच्या विक्री प्रक्रियेतही बरेच महत्त्वाचे बदल करण्याचे संकेत दिले आहेत. एका कुटुंबात याआधी सिडकोचे घर असले तरी परत एकदा संबंधित कुटुंबाला दुसरे घर घेता यावे यासाठी अटीत बदल केले जातील, असे संजय शिरसाट यांनी सांगितले. म्हणजेच हा बदल प्रत्यक्षात आला तर एकाच घरात सिडकोची अधिक घरे विकत घेता येतील. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईत राहणाऱ्या व्यक्तीला सिडकोत घर घेता यावे हाच यामागचा उद्देश आहे असे संजय शिरसाट म्हणाले.
नवी मुंबई परिसरात सिडकोची एकूण ६७ हजार घरे निर्माण करणार आहेत. त्यातील २६ हजार घरांच्या विक्रीची प्रक्रिया सध्या चालू आहे. त्यासाठी माझ्या पसंतीचे सिडको घर योजना राबवली जात आहे. सिडकोचे घर देण्यासाठी नोंदणी करण्याची मुदत १० जानेवारी रोजी संपली असून आता पुढच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
हे ही वाचा: