Thursday, April 25, 2024

Latest Posts

नियमित मुंबई – पुणे महामार्गावरून प्रवास करणाऱ्यासाठी खुशखबर

मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे वर वाहनांची रेलचेल बघायला तर नेहमीच मिळते. त्याचप्रमाणे या एक्सप्रेस वे वर दुतर्फा गाड्यांची गर्दी आणि ट्राफिक बघायला मिळत असते.

मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे वर वाहनांची रेलचेल बघायला तर नेहमीच मिळते. त्याचप्रमाणे या एक्सप्रेस वे वर दुतर्फा गाड्यांची गर्दी आणि ट्राफिक बघायला मिळत असते. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न उभा राहतो. तसेच काम करणाऱ्या लोकांना किंवा ज्यांना नियमित पणे मुंबई ते पुणे असा प्रवास करावा लागतो त्यांच्यासाठी मुंबई-पुणे नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लवकरच दिलासा मिळणार आहे. मुंबई-पुणे दरम्यान नियमित प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबई – पुणे महामार्गावरून प्रवास करण्यासाठी लागणार वेळ हा तब्बल कमीत कमी वेळ लागणार आहे. तसेच कमीत कमी वेळात जास्त अंतर आपण या महामार्गावरून काटता येणार असल्याने प्रवासाचा आनंद हा द्विगुणित होणार आहे.

२०२५ पासून मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग वर प्रवाशांसाठी महत्वाची उपाययोजना करणार आहे. त्यांच्याबरोबर नियमित प्रवास करणाऱ्यांसाठी २०२५ साली नवीन पावले उचलली जाणार आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग हा सिग्नलमुक्त करण्यात येणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणने (एमएमआरडीए) या दिशेने पावले उचलली आहेत. यामुळे इंधनाची मोठी बचत होणार आहे. तसेच वाहनचालकांच्या वेळेचीही बचत होणार आहे. सरकारने तब्बल १०९२ कोटी रुपये खर्चून यासाठी ४.५ किमी लांबीचा एलिव्हेटेड कॉरिडॉर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा कॉरिडॉर शिवडी-न्हावा शेवा ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प (MTHL) आणि हा मार्ग मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेला जोडला जाणार आहे. रायगड जिल्ह्यातील चिर्ले इंटरचेंज ते मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे दरम्यान हा प्रकल्प होणार आहे.त्याचबरोबर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणकडून या संबंधी अधिक माहिती दिली जाणार आहे. तसेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून येत्या तीन महिन्यांत हा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती समोर येत आहे.

राज्यातील दोन सर्वोत्तम रस्त्यांना जोडणारा हा प्रकल्प 30 महिन्यांत पूर्ण करण्यात येणार आहे. सुमारे ४.५ किमी लांबीच्या कनेक्टरच्या बांधकामासाठी सुमारे १०९२ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या टेंडरची प्रक्रिया जूनअखेरपासून करण्यात येणार आहे. त्याचबरोबर मुंबई ते नवी मुंबई अंतर कमी करण्यासाठी समुद्रावर २२ कि.मी. लांबीचा पूल बांधण्यात येत आहे. या मार्गावर सिग्नल असणार नाही. मुंबई ते नवी मुंबई हे अंतर १५ ते २० मिनिटांत कापता येणार आहे. पुलाचे काम जवळपास ९४ टक्के पूर्ण झाले आहे. 2023 च्या अखेरीस हा पूल वाहनांच्या वाहतुकीसाठी खुला केला जाईल.चिर्ले येथे हा पूल पूर्णत्वास येत असल्याने वाहनांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू शकतो. या समस्येवर मात करण्यासाठी एमएमआरडीएने एमटीएचएलला थेट मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेशी कनेक्टरद्वारे जोडण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मुंबईहून मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर जाण्यासाठी दीड ते दोन तास लागतात. एमटीएचएल आणि प्रस्तावित एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या बांधकामामुळे हा प्रवास 20 ते 25 मिनिटांपर्यंत कमी होणार आहे. मुंबई-पुणे दरम्यान सिग्नल फ्री मार्ग उपलब्ध करून देण्याबरोबरच गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांचा मार्ग सुकर करण्यासाठी एमएमआरडीएने योजना तयार केली आहे. याअंतर्गत एमटीएचएलही थेट मुंबई-गोवा महामार्गाशी जोडण्यात येणार आहे.

हे ही वाचा:

महालक्ष्मीच्या चरणी Bai Pan Bhari Deva ची टीम नतमस्तक । Music Launch at Mahalaxmi

राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक रवी जाधव यांचा ‘बाल शिवाजी’चा फर्स्ट पोस्टर प्रदर्शित

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss