spot_img
Wednesday, February 19, 2025

Latest Posts

दबक्या पावलांनी आला आणि हल्ला करून गेला; CCTV मध्ये व्हिडीओ आला समोर

पोलिसांच्या हाती लागलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी तोंड बांधून दबक्या पावलांनी इमारतीच्या पायऱ्यांवरून वरती येताना दिसत आहे.

हिंदी सिनेसृष्टीतील अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) वर हल्लेखोराने घरात शिरून चाकूने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. सैफवर सहा वार करण्यात आले. त्यापैकी तीन वार हे अत्यंत गंभीर होते, लीलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केल्या. या शस्त्रक्रियेमध्ये अडीच इंचाचा चाकूचा तुकडा सैफच्या पाठीतून काढला. हल्ल्याच्यावेळी सैफच्या पाठीत हा चाकूचा तुकडा अडकला होता. आता अभिनेत्याची प्रकृती स्थिर असून त्याच्या जीवावरचा धोका टळला असून लवकरच त्याला आयसीययूमधून बाहेर आणण्यात येईल, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.

अभिनेता सैफ अली खानच्या घरी चोराने घुसून प्राणघातक हल्ला केला. तो चोर घरात शिरला कसा असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. घटनेननंतर चोर पळ काढताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाले होते. मात्र तो आतमध्ये कसा आला याचा तपास सुरु असतानाच अखेर पोलिसांच्या प्रयत्नांना यश आले असून तो पायऱ्या चढतानाच सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे.

पोलिसांच्या हाती लागलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी तोंड बांधून दबक्या पावलांनी इमारतीच्या पायऱ्यांवरून वरती येताना दिसत आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये हल्लेखोर काळया रंगाचे टी-शर्ट पॅन्ट आणि बॅग घेऊन लपत लपत पायऱ्या चढताना दिसत आहे. तसेच सैफ अली खानच्या पाठीत धारदार शस्त्राने वार झाले होते त्या खुपसलेल्या चाकूचा तुकडा सैफच्या पाठीत अडकला होता. डॉक्टरांनी सैफ अली खाचा पाठीत अडकलेल्या अडीच इंचाच्या चाकूचा तुकडा शस्त्रक्रिया करून काढला. आता सैफची प्रकृती स्थिर असल्याचेही डॉक्टरांनी सांगितले.

हे ही वाचा : 

नागरिकांना शासकीय सेवा मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध करून द्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सहाय्य्क प्राध्यापकाच्या ५०० हुन अधिक जागांची भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss