काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा मुंबईत पावसाला (Mumbai Rain) सुरुवात झाली आहे. दक्षिण मुंबईसह (South Mumbai) पूर्व आणि पश्चिम उपनगरात (Eastern and western suburbs) पहाटेपासून अधून मधून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. पश्चिम उपनगरात सकाळी सहा वाजल्यापासून पाऊस सुरू आहे. दरम्यान, कुर्ला (Kurla) पश्चिमेत सीएसटी रोडवर (CST Road) परिसरात पावसाचा जोर जास्त असल्यामुळं सीएसटी रोड परिसरात रस्त्यावर दीड ते दोन फूट पाणी भरलं आहे. कुर्ला परिसरामध्ये अर्धा तास मुसळधार पाऊस झाला. यामुळं कुर्ला सीएसटी रोडवर मोठ्या प्रमाणात पाणी भरले आहे. सध्या कुर्ला परिसरात पावसाचे जोर कमी झाला आहे. त्यामुळं सीएसटी रोडवर भरलेलं पाणी कमी होत आहे.
सध्या राज्यात पावसानं दडी मारली आहे. पावसाअभावी खरीपाची पिकं (Kharif crops) वाया जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, सध्याची कोणतीही वातावरणीय प्रणाली महाराष्ट्रात जोरदार पावसासाठी पूरक जाणवत नसल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे (Mainkrao Khule) यांनी दिली आहे. पुढील संपूर्ण पंधरवाडा म्हणजे ७ सप्टेंबरपर्यंत मुंबईसह कोकण (Kokan) आणि काहीसा घाटमाथा वगळता उर्वरित महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी केवळ किरकोळ पावसाव्यतिरिक्त ढगाळ वातावरणाची शक्यताच अधिक जाणवत असल्याचे खुळे म्हणाले.
मुंबईसह कोकणात जोरदार तर सह्याद्रीच्या घाट माथ्यावर (Ghat tops of Sahyadri) मध्यम पावसाची शक्यता मात्र कायम आहे. सप्टेंबर ७ नंतरच्या पावसाची स्थिती त्यावेळीच वातावरणातील बदलावर अवलंबून असेल असे खुळे म्हणाले. जून, जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यात एल-निनो सुप्तावस्थेत तर आयओडी तटस्थवस्थेत असतानाही समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळं सध्या एल निनोचा मोठा प्रभावामुळं कमी पाऊस पडत आहे. १ सप्टेंबरनंतर केव्हाही राजस्थानातून (Rajasthan) मागे फिरणारा परतीच्या पाऊस आणि त्याचबरोबर नेमका ह्याच संपूर्ण सप्टेंबर महिन्यात मान्सूनच्या बंगाल (Bengal) उपसागरीय शाखेतून पूर्वा, उत्तरा, हस्त, व चित्रा ह्या चार नक्षत्रातून पडणाऱ्या पूर्वेकडचा ठोकवणी पावसाची तरी काय अपेक्षा ठेवावी? असे खुळे म्हणाले. ज्याने तीन महिने साथ दिली नाही, त्याच्याकडून सप्टेंबरसहीत उर्वरित दिड महिन्यात पावसासाठी काय अपेक्षा ठेवावी? असे खुळे म्हणाले. शेती निगडीत महाराष्ट्रातील दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, साखर कारखानदारी, तसेच सिंचन विभाग यांनाही या पावसाच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक नियोजनात गंभीरपणे विचार करण्याची वेळ येऊ शकते. कारण, सध्याची पावसाची वस्तुस्थिती झाकता येत नाही.
हे ही वाचा:
शिवसेना ठाकरेगटाला आणखी एक मोठा धक्का, ‘या’ माजी आमदाराचा शिंदे गटात प्रवेश…
खडलेल्या मुंबई-गोवा महामार्गासाठी मनसे रस्त्यावर, अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात जागर पदयात्रा…
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.