Friday, December 1, 2023

Latest Posts

मुंबईतील वाढत्या प्रदूषणावर हायकोर्ट आक्रमक

दिपावलीनिमित्त हवेची गुणवत्ता उत्तम राखण्यासाठी हायकोर्टाने आज आक्रमक भूमिका घेतली. विकासकामांपेक्षा लोकांचा जीव महत्त्वाचा असून काही दिवस बांधकामे बंद राहिलं तर आभाळ कोसळणार आहे का? असा सवाल हायकोर्टाने आज सुनावणी दरम्यान केला.

दिपावलीनिमित्त हवेची गुणवत्ता उत्तम राखण्यासाठी हायकोर्टाने आज आक्रमक भूमिका घेतली. विकासकामांपेक्षा लोकांचा जीव महत्त्वाचा असून काही दिवस बांधकामे बंद राहिलं तर आभाळ कोसळणार आहे का? असा सवाल हायकोर्टाने आज सुनावणी दरम्यान केला. मुंबई महापालिकेने विनंती केल्यानंतर हायकोर्टाने चार दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. चार दिवसात हवेची गुणवत्ता चांगली न झाल्यास बांधकामावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला जाईल असेही हायकोर्टाने म्हटले.

बांधकाम बंदीबाबत प्रशासनाला हायकोर्टाकडून अखेरची संधी देण्यात आली असल्याचे कोर्टाने स्पष्ट केले आहे. येत्या शुक्रवारपर्यंत हवा गुणवत्ता निर्देशांकात (AQI) सुधारणा न झाल्यास दिवाळीचे चार दिवस बंदी लागू करणार असल्याचे हायकोर्टाने म्हटले. बांधकामातील डेब्रिज वाहून नेणारी वाहनं ताडपत्रीनं पूर्णपणे झाकणं बंधनकारक असून फटाक्यांवर बंदी घालण्याची इच्छा नाही असे सांगताना कोर्टानं घालून दिलेल्या निर्देशांच काटेकोर पालन करा असेही हायकोर्टाने सांगितले. मुंबई महापालिका आणि पोलिसांनी हे सुनिश्चित करावे की फटाके फोडण्याबाबत कोर्टाच्या नियमांचे पालन केलं जातंय की नाही. आवाज करणारे फटाके रात्री 7 ते 10 या वेळेतेच वाजवण्यास परवानगी देण्यात आली आहे. वेळेबाबत निर्धारित करून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे हायकोर्टाने निर्देश दिले आहेत.


पालिकेनं याबाबत काहीतरी ठोस उपाययोजना करायला हवी असेही दरायस खंबाटा यांनी म्हटले.

हवेच्या गुणवत्ता निर्देशांकाबाबत केवळ अँक्शन प्लान तयार करून उपयोग नाही. त्यावर तातडीची अंमलबजावणी होणं गरजेचं असल्याचे खंबाटा यांनी म्हटले.

खालावत चालेली हवेची गुणवत्ता ही कुणा एकाची जबाबदारी नाही. सर्व प्रशासकीय यंत्रणांनी एकत्र येऊन याबाबत काम केलं पाहिजे. हा विषय केवळ मुंबई महापालिकेबाबत मर्यादीत नाही, इतर पालिकांची जबाबदारी आहे अशी सूचना मुख्य न्यायमूर्तींनी महाधिवक्ता बीरेंद्र सराफ यांना केली.

 

हे ही वाचा : 

‘बिग बॉस’च्या घरात अंकिता लोखंडे आणि विकी जैनमध्ये वाद

संजय राऊत यांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल, मुख्यमंत्री भाजपची भांडी घासतात…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

 

Latest Posts

Don't Miss