spot_img
Sunday, February 9, 2025

Latest Posts

मागील ५ वर्षात Best अपघातात किती नागरिक मृत्युमुखी? किती कर्मचारी निलंबित?

मागील ५ वर्षात ८३४ बेस्टचे बसअपघात घडल्याची माहिती देत ८८ जीवितहानी झाल्याची कबूली बेस्ट प्रशासनाने दिली आहे. यात मरणांकत आणि जखमी नागरिकांना ४२. ४० कोटींची आर्थिक नुकसानभरपाई दिली गेली आहे.

मागील ५ वर्षात ८३४ बेस्टचे बसअपघात घडल्याची माहिती देत ८८ जीवितहानी झाल्याची कबूली बेस्ट प्रशासनाने दिली आहे. यात मरणांकत आणि जखमी नागरिकांना ४२. ४० कोटींची आर्थिक नुकसानभरपाई दिली गेली आहे. तर १४ कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे आणि २४ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. अशी माहिती बेस्ट प्रशासनाने आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस दिली आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी बेस्ट प्रशासनाकडे मागील ५ वर्षात घडलेल्या अपघाताची, जीवितहानी आणि आर्थिक नुकसानभरपाईची माहिती विचारली होती. बेस्टचे वरिष्ठ वाहतुक अधिकारी ईगाल बेंजामिन यांनी अनिल गलगली यांस मागील 5 वर्षांची सविस्तर माहिती दिली. मागील ५ वर्षात ८३४ बेस्ट बस अपघात झाले असून यात बेस्ट आणि खाजगी कंत्राटदार यांचा समावेश आहे. बेस्टचे ३५२ अपघात असून यात जीवितहानीची संख्या ५१ आहे तर खाजगी कंत्राटदारांकडून करण्यात आलेल्या ४८२ अपघातात ३७ जीवितहानी झाली आहे. वर्ष २०२२-२३ आणि वर्ष २०२३-२४ मध्ये सर्वाधिक प्रत्येकी २१ जीवितहानी झाली आहे. मागील ५ वर्षांत मरणांकत आणि जखमी यांस ४२.४० कोटींची आर्थिक नुकसानभरपाई देण्यात आली असून ४९४ प्रकरणे होती. यात सर्वाधिक रक्कम ही वर्ष २०२२-२३ यात देण्यात आली. त्यावर्षी १०७ प्रकरणात सर्वाधिक आर्थिक नुकसान भरपाई रक्कम १२.४० कोटी इतकी आहे. वर्ष २०१९-२० मध्ये ९. ५५ कोटी, वर्ष २०२०-२१ मध्ये ३.४४ कोटी, वर्ष २०२१-२२ मध्ये ९. ४५ कोटी, वर्ष २०२३-२४ मध्ये ७.५४ कोटी ही आर्थिक नुकसानभरपाईची रक्कम आहे.

मागील ५ वर्षांत प्राणातंक अपघातात कर्मचारी बडतर्फ संख्या १२ आहे आणि वैयक्तिक इजा प्रकरणात २ कर्मचारी बडतर्फ करण्यात आले आहेत. वैयक्तिक इजा प्रकरणात २४ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. अन्य कारवाईत ताकीद, समज, सक्त ताकीद, वसुली, द्वंद्वतन श्रेणीत कपात अशी कारवाई करण्यात आली आहे. ही आकडेवारी बेस्ट प्रशासनाची सुरक्षिततेची जबाबदारी अधोरेखित करते. यावरून प्रशासन आणि कर्मचाऱ्यांकडून अधिक खबरदारी घेण्याची आवश्यकता स्पष्ट होते, असे अनिल गलगली यांचे म्हणणे आहे.

हे ही वाचा:

अजितदादा….दोषींना शिक्षा देण्यात सरकार अपूर्ण पडले तर…काय म्हणाले Rohit Pawar?

Central Railway चा खोळंबा; उशिराने धावणाऱ्या लोकलमुळे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss