spot_img
spot_img
Wednesday, October 4, 2023
spot_img
spot_img

Latest Posts

मुंबईमध्ये मागील काही दिवसात २ आरोपींनी जेलमध्ये गळफास घेऊन केली आत्महत्या

मुंबईमध्ये (Mumbai) मागील काही दिवसांपासून अनेक धकादायक प्रकार घडत आहेत. अशीच एक घटना मुंबईतील पवई (Powai) परिसरात घडली होती.

मुंबईमध्ये (Mumbai) मागील काही दिवसांपासून अनेक धकादायक प्रकार घडत आहेत. अशीच एक घटना मुंबईतील पवई (Powai) परिसरात घडली होती. पवई परिसरातील एन जी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीत राहणाऱ्या एअर होस्टेल(Air Hostel) रूपल ओग्रेची (Rupal Agre) गळा चिरून हत्त्या करण्यात आली होती. या प्रकरणी पवई पोलिसांनी विक्रमला अटक केली होती. त्यांनतर पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर आरोपी विक्रम अटवाल याला ८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आली होती. मात्र विक्रम याने पहाटे जेलमध्ये पँटने गळफास घेत आत्महत्या केली. जेलमध्ये गळफास घेण्याची ही दुसरी घटना मुंबईमध्ये घडली आहे.

मुंबई मधील पवई परिसरात राहणारी रुपल ओग्रे या एअर होस्टेसची तिच्या राहत्या घरी गळा चिरून हत्या करण्यात आली.या हत्याप्रकरणी आरोपी विक्रमला अटक करण्यात आली आहे. रुपलच्या नातेवाईकांनी तिला तिच्या मोबाईलवर फोन करण्याचा प्रयत्न केला पण ती कॉल उचलत नसल्यामुळे तिच्या काही जवळच्या मित्रांना तिच्या आईवडिलांनी संपर्क केला. त्यांतर तिचा एक मित्र तिच्या राहत्या घरी गेला असता तिच्या फ्लॅटला कुलूप दिसले. त्यानंतर सोसायटीला याबाबत माहिती दिली,नंतर ही माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी डुप्लिकेट चावीने दरवाजा उघडला असता रुपल त्यांना मृतावस्थेत आढळून आली. रुपलचा गळा चिरुन तिचा खून करण्यात आला होता. रुपलच्या खुनानंतर पोलिसांनी इमारतीतील सीसीटीव्ही फुटेज, सोसायटीत काम करणारे इतर कर्मचारी, वैद्यकीय तपासणी आणि तांत्रिक मदत यासर्वांची चौकशी केल्यानंतर आरोपी विक्रम यास अटक करण्यात होती. विक्रमला ८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. आज त्याची पोलीस कोठडी संपणार होती. पण त्या आधीच त्याने कोठडीमध्ये पँटने गळफास घेतला.

या आधीसुद्धा मुंबई मध्ये अशा काही घटना घडल्या आहेत. बोरिवली (Borivali) पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या पोलीस कोठडीमध्ये २७ जुलैच्या पहाटे दीपक जाधव याने गळफास घेतला. आरोपीसाठी लॉकअप (lockup) सुरक्षित मानले जात असताना मागील एक दीड महिन्याच्या कालावधीत दोन आरोपींनच्या आत्महत्येमुळे सुरक्षेविषयीचा प्रश्न निर्मण झाला आहे.

हे ही वाचा: 

‘दिल दोस्ती दिवानगी’ आपल्या भेटीला

टोमॅटोच्या भावात मोठी घसरण

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss