मुंबईत इंडिया आघाडीची बैठक सुरु आहे. काल २८ पक्षांचे नेते मुंबईतल्या हयात हॉटेलमध्ये दाखल झाले होते. आज सकाळी फोटोसेशन आटोपल्यानंतर बैठकीला सुरुवात झाली आहे. इंडिया आघाडीतील नेत्यांची बैठक संपन्न झाल्यानंतर पत्रकार परिषद होईल असे देखील सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर या बैठकीला एकूण २८ पक्षातील महत्वाचे नेते मंडळी उपस्थित राहणार आहे. तसेच त्यापूर्वी फोटोसेशन झाल्यानंतर बैठकीत नेते बोलत आहे. मुंबईमध्ये इंडिया आघाडीची बैठक सुरु आहे. या बैठकीमध्ये बोलताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी सहकाऱ्यांना सावध केलं असून अटकेची तयारी ठेवा, असं म्हटलं आहे.
देशातील विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची बैठक मुंबईतील ग्रँड हयात या हॉटेलमध्ये सुरू आहे. आज बैठकीचा दुसरा दिवस असून इंडिया आघाडीचा लोगो आणि संयोजक ठरवण्यात येणार असल्याची माहिती आहे. तर नेत्यांच्या फोटोसेशनमध्ये पहिल्या रांगेत अनेक नेत्यांना स्थान मिळाले आहे. राहुल गांधी दाटीवाटीत उभे राहिल्याचं दिसत आहे.दरम्यान, इंडिया आघाडीच्या फोटोसेशनमध्ये पहिल्या रांगेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत, मेहबुबा मुफ्ती, अरविंद केजरीवाल, नितीश कुमार, ममता बॅनर्जी, सोनिया गांधी, उद्धव ठाकरे, शरद पवार, मल्लिकार्जुन खर्गे, लालुप्रसाद यादव, एम. के. स्टॅलिन, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, फारूक अब्दुल्ला या नेत्यांचा सामावेश आहे. तर राहुल गांधीही पहिल्याच रांगेत उभे आहेत पण ते इतर नेत्यांच्या दाटीवाटीत उभे असल्याचं या फोटोमध्ये दिसत आहे.इंडिया आघाडीच्या मुंबईतील बैठकीतील एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या बैठकीत तीन मोठे आणि महत्त्वाचे ठराव करण्यात आले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे ठराव महत्त्वाचे आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजप आणि एनडीच्या उमेदवारांचा पराभव करण्यासाठी इंडिया आघाडीकडून आज महत्त्वाची रणनीती आखण्यात आली. या रणनीतीचा एक भाग म्हणून हे तीन ठराव करण्यात आले आहेत. या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झालीय. या मुद्द्यांबाबत इंडिया आघाडीचे नेते पत्रकार परिषदेत माहिती देणार आहेत. पण त्याआधी त्यांनी तीन ठराव केल्याची माहिती समोर आली आहे.
राहुल गांधी यांनी सगळ्यांचा आभार मानून भाषणाला सुरवात केली. इडनीय आघाडी हि भाजपाला हरवणारच असा विश्वास त्यांनी दर्शवला. भाजप सरकार गरिबांचा पैसे व्यावसायिकांना देते असा दावा देखील राहुल गांधी यांनी व्यक्त केला आहे. राहुल गांधी यांनी भ्रष्टाचाराच्याव विरोधात भाजपवर हल्लाबोल केला आहे. आमच्याकडून गरीब आणि शेतकऱ्याच्या प्रश्नासंबंधी काम केले जाणार आहे असे राहुल गांधी यांनी आश्वासन दिले आहे. राहुल गांधी चीन भारताच्या जमिनीवर अतिक्रमण केलं जात आहे असेदखील राहुल गांधी म्हणाले. त्याचबरोबर राहुल गांधी हे लदाख दौऱ्यावर असताना राहुल गांधी यांनी लढक ची संबंध माहिती घेतली. परंतु आपले प्रसार माध्यम ही या सगळ्या पश्नांकडे लक्ष केंद्रित करत नाही असे देखील राहुल गांधी म्हणाले आहेत. नरेंद्र मोदी आणि अदानी यांच्यातील व्यवहार काय आहेत हे तुम्हाला मी सांगिलेच परंतु नरेंद्र मोदी G २०करार करत आहे आणि हा हिंदुस्तानच्या प्रतिष्टेचा सवाल आहे असे राहुल गांधी म्हणाले. एकत्र मिळून जर आपण निवडणूक लढली तर भाजपाची आणि नरेंद्र मोदी यांची मत नक्की आहे. अदानी प्रकरणावर नरेंद्र मोदी का बोलत नाही असा प्रश्न देखील राहुल गांधी यांनी उपस्तित केला आहे.
शरद पवार यांनी भाजप सरकारवर प्रत्येक जण नाराज असल्याचा वक्तव्य शरद पवार यांनी केला. या बैठकीत 28 पक्ष सहभागी झाले. देशातील वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या समस्या आहेत. देशातील 28 पक्ष एकत्र आले आहे. इंडिया नावावर एक नवीन मिशन सुरु करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार असे म्हणताच इंडिया आघाडीमधील नेते हसायला लागले. लालूप्रसाद यादव म्हणाले की, आमचे सर्व देशातील नेते एक नव्हते याचा फटका देशाला बसला मोदींना याचा फायदा झाला. आम्ही सुरुवातीपासून सांगत आलोय भाजप हटाव देश बचाव. भाजपच्या नेत्यांनी इंडियाच्या नेत्यांना घमंडीया म्हंटलं आहे . त्याचबरोबर