Monday, November 20, 2023

Latest Posts

येत्या दोन दिवसांत डिलाईल रोडच उद्घाटन केलं जाण्याची शक्यता

मुंबईतील डिलाईल रोड उड्डाणपुलांचं याच आठवड्यात उद्घाटन होण्याची शक्यता आहे. हा उड्डाणपूल जुलै २०१८ पासून बंद आहे. त्याच्या निषेधात गेल्या आठवड्यात ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी उद्घाटन केलं होतं. त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल झाला होता. त्यानंतर अखेर मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर आणि मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते अखेर येत्या दोन दिवसांत औपचारिक उद्घाटन केलं जाण्याची शक्यता आहे. त्यासाठीची सगळी तयारीही पूर्ण करण्यात आली आहे.

ना. म. जोशी मार्गावरील लोअर परळ पूल धोकादायक बनल्यामुळे काही वर्षांपूर्वी वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. या पुलाचे काम विविध कारणांमुळे रखडले होते. त्यामुळे लोअर परळ आणि आसपासच्या परिसरात वाहतूक कोंडीचा प्रश्न जटील बनला होता. या पुलावरील दक्षिण वाहिनीचे काम पूर्ण होत आले असून पथदिवे, मार्गिका आखणी, रंगकाम आदी कामेही लवकरच पूर्ण करून हा पूल तीन-चार दिवसांत वाहतुकीसाठी खुला करण्याचा मुंबई महानगरपालिकेचा मानस होता. असे असतानाही आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली १६ नोव्हेंबर रोजी पुलावरील दक्षिण वाहिनीवरील रस्तारोधक हटवून, नारळ फोडून ती वाहतुकीसाठी खुली झाल्याचे जाहीर केले. मात्र यावर विरोधक टीका करत आहेत

लोअर परल उड्डाणपुलावरून आदित्य ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झालाय त्या पुलाची स्थिरता चाचणी अद्याप झालेली नाही. त्यामुळे या वाहिनीवरून वाहतूक करणे धोकादायक असल्याने मुंबई महानगरपालिकेचे दुय्यम अभियंता पुरूषोत्तम इंगळे यांनी ना. म. जोशी पोलीस ठाण्यात तक्रार देताना म्हटलं आहे. मात्र अशा प्रकारे लोकांच्या हितासाठी माझ्यावर गुन्हे दाखल होत असतील तर मी मुंबईकरांसाठी आणि महाराष्ट्रासाठी गुन्हे दाखल करून घ्यायला तयार आहे असा आव्हान आदित्य ठाकरे यांनी सरकारला दिले आहे .

अनेकदा अनेक ठिकाणी आंदोलन आणि मोर्चामुळे विरोधक आदित्य ठाकरे आणि ठाकरे घराण्यावर तुमच्यासाठी कार्यकर्ते गुन्हे दाखल करून घेतात. तुम्ही रस्त्यावर उतरा आणि गुन्हे दाखल करा अशी टीका करताना पाहायला मिळतात. त्यातच आता आदित्य ठाकरे यांच्यावर पहिला गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे आगामी काळात आक्रमक होतात का आणि बाळासाहेबांनी म्हटल्याप्रमाणे लोकांसाठी काम करतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हे ही वाचा:

CRIME: सायबर चोराकडून डॉक्टरांची फसवणूक

प्रत्येक पुरुषांनीही हा चित्रपट पाहायला हवा, राज ठाकरे, १०० रुपये तिकीट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss