spot_img
Saturday, December 7, 2024
spot_img

Latest Posts

आमच्या महाराष्ट्राला गुजरातमधून चालवू देणार नाही, PM Narendra Modi यांच्या शिवाजी पार्कवरील सभेवरून Jayant Patil आक्रमक 

राज्यात आता विधानसभा निवडणुकांचे (Maharashtra Vidhansabha Election 2024) वारे वेगाने वाहू लागले आहेत. निवडणूक आयोगाने (Election Commission) मंगळवारी (१५ ऑकटोबर) पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर केला. राज्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार असून २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणीची प्रक्रिया पार पडून निकाल जाहीर होणार आहेत. राज्यातील सर्वच पक्ष या अनुषंगाने आता मैदानात उतरले असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीला लागले आहेत. अश्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची सभा काल (शुक्रवार, १४ नोव्हेंबर) मुंबईतील शिवाजी पार्क येथे पार पडली. यावेळी त्यांनी काँग्रेससह महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) जोरदार टीका केली. आता, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी पंतप्रधान मोदींसह चांगलाच निशाणा साधला आहे.

विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असून प्रत्येक पक्षाच्या स्टार कॅम्पेनर्सच्या सभांचा धडका सुरू आहे. मात्र अशातच काल छत्रपती शिवाजी पार्क येथे झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेवरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महायुती सरकारला टोला लगावला आहे.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवरून याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “मुंबईतील छत्रपती शिवाजी पार्कवरील पंतप्रधान मोदींच्या आजच्या सभेचे चित्र पाहिल्यावर एक गोष्ट अधोरेखित झाली ती म्हणजे, आम्ही महाराष्ट्रजन आमच्या महाराष्ट्रला गुजरातमधून चालवू देणार नाही,” असे म्हणत त्यांनी थेट इशाराच महायुती सरकारला दिला आहे. “हे राज्यही आमचे येथील लोकंही आमची आणि इथे आवाजही आमचाच… जय महाराष्ट्र !!!” असे वक्तव्य जयंत पाटील यांनी केले आहे.

नरेंद्र मोदींचे काँग्रेसवर टीकास्त्र

मुंबईत भाषण करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “मुंबई ही स्वप्नांची नगरी आहे, त्यामुळे महायुती ही स्वप्ने पूर्ण करणारी युती आहे. आज आपण विकासकामे कोणत्या स्तरावर पुढे नेत आहोत हे प्रत्येक मुंबईकराला दिसत आहे. आमचे सरकार मुंबईला सर्व कनेक्टिव्हिटीच्या समस्यांपासून मुक्त करू इच्छित आहे. आपल्या देशात स्वातंत्र्यानंतर अनेक दशके केंद्रात काँग्रेसचे सरकार होते, इथेही काँग्रेसचेच दशके सरकार होते. पण मुंबईबाबतच्या कोणत्याही फॉरवर्ड प्लॅनिंगची त्यांनी पर्वा केली नाही. त्याचा परिणाम असा झाला की मुंबई सतत मागे पडली. काँग्रेसचा मूड मुंबईच्या अगदी उलट आहे. मुंबईचा मूड म्हणजे प्रामाणिकपणा आणि मेहनत. मुंबईचा मूड म्हणजे पुढे जाण्याची ऊर्मी. पण काँग्रेसचा मूड भ्रष्टाचाराचा आहे. देशाला मागे ढकलण्याची काँग्रेसची मनस्थिती आहे. विकासात अडथळे निर्माण करण्याची काँग्रेसची मनस्थिती आहे. काँग्रेस आणि आघाडी फक्त आणि फक्त तोडण्याची भाषा बोलतात. प्रत्येक जातीचे, समाजाचे लोक मुंबईत येतात आणि एकत्र राहतात. मात्र, महाआघाडीचे लोक जातीच्या नावावर लोकांमध्ये भांडणे लावण्यात व्यस्त आहेत.”

हे ही वाचा:

Avinash Jadhav Exclusive Interview: मी काय-काय करतो हे जगाला का दाखवत नाही तुम्ही? अविनाश जाधवांचा उद्विग्न सवाल

अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना दिले थेट आव्हान…, म्हणाले…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss