मागच्या महिन्यात मुंबईत अनेक वर्षांपासून धावणाऱ्या डबल डेकर बसची (Double Decker Bus) सेवा बंद करण्यात आली. बसचा वाढता खर्च आणि मिळणारे कमी उत्पन्न यामुळे बस बंद करण्याचा निर्णय बेस्टच्या विभागाकडून घेण्यात आला होता. अशातच, आता मुंबईतून टॅक्सीची सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईची टॅक्सी (Mumbai Taxi) अर्थात काली-पिली तिच्या रंगावरून ओळखली जात होती. मुंबई ही महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आहे. आता सगळीकडे ओला-उबरसारख्या कॅबची (Ola-Uber Cab) सेवा अस्तित्वात असल्यामुळे टॅक्सीने प्रवास करणे कमी झाले आहे. नवीन मॉडेल आणि अॅपवर आधारित कॅब सेवेनंतर आता या काळ्या-पिवळ्या टॅक्सी मुंबईच्या रस्त्यांवरून जाणार आहेत. परिवहन विभागाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, शेवटची ‘प्रीमियर पद्मिनी’ (Premier Padmini) २९ ऑक्टोबर २००३ रोजी तारदेव आरटीओ येथे काळी-पिवळी टॅक्सी म्हणून नोंदणीकृत झाली होती. शहरात टॅक्सी चालवण्याची मर्यादा २० वर्षे असल्याने सोमवारपासून मुंबईत प्रीमियर पद्मिनी टॅक्सी अधिकृतपणे धावणार नाहीत.
काही वर्षांपूर्वी, मुंबई टॅक्सीमेन्स युनियन (Mumbai Taximen’s Union) या शहरातील सर्वात मोठ्या टॅक्सी चालकांच्या संघटनेने किमान एक काळी-पिवळी टॅक्सी (Black-Yellow Taxi) टिकवून ठेवण्याची विनंती सरकारकडे केली होती, परंतु त्याला यश आले नाही. परळचे रहिवासी आणि कलाप्रेमी प्रदीप पालव यांनी सांगितले की, आजकाल ‘प्रीमियर पद्मिनी’ टॅक्सी मुंबईत भिंतींवरील पोस्टर्सवरच दिसतात. मुंबईतील शेवटच्या नोंदणीकृत टॅक्सीचे मालक प्रभादेवी म्हणाले, ही टॅक्सी मुंबईचा अभिमान आणि आमचे जीवन आहे. तर काही लोकांनी संग्रहालयात किमान एक प्रीमियर पद्मिनी जपली जावी, अशी मागणी केली आहे.
हे ही वाचा :
Vande Sadharan Express प्रवाशांसाठी होणार दाखल