संत शिरोमणी सावतामाळी मित्र मंडळ या संस्थेच्या सानिध्यातून क्रांती-ज्योती सावित्रीबाई ज्योतीबा फुले व पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांचे ३०० व्या वर्षाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील कर्तृत्ववान नवदुर्गांचे कौतुक सत्कार प्रतिवर्षी साजरा होत असतो. कोळी समाजाने रणरागिणी, सबला, अनाथ महिलांचे अश्रू पुसण्याचा विडा उचलला जातो. अशा राजश्री प्रकाश भानजी यांच्या कार्याचा कर्तृत्वाचा शौर्याचा, जिद्दीचा आणि हक्काच्या अधिकाराची दखल घेऊन हा सत्कार सोहळा पार पाडला जातो.
संत शिरोमणी सावता माळी मित्र मंडळ यांनी राजश्री प्रकाश भानजी ताई यांच्यासह कोळी समाजाचा महान सत्कार करून माळी- कोळी समाजांना उत्तेजित करून पुढील समाज कार्याची वैभवशाली मुहूर्तमेढ रोवली. तसेच किर्ती आणि क्रांती साधण्यासाठी भरभक्कम प्रगतीची प्रेरणा आत्मसाद करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्नशील राहणे महत्वाचे आहे.
सर्व महिलांसाठी राजश्री प्रकाश भानजी या नेहमीच आदर्श राहिल्या. २०१५ साली त्यांच्या पतीचं छत्र हरवलं, तेव्हा राजश्री भानजी यांचे आयुष्य दुःखाने उद्ध्वस्त झालं होतं. मात्र, समाजाने त्यांच्यावर लादलेले अन्यायकारक रूढी आणि विधवांना डावलण्याच्या परंपरा त्यांनी ठामपणे नाकारल्या. टिकली लावणं, मंगळसूत्र घालणं, हे सगळं त्या करतात, कारण त्यांच्या मते, “माझं सौभाग्य या जगातून जरी निघून गेलं असलं तरी त्यांचं प्रेम आणि आशीर्वाद माझ्यासोबत आहे. तेच मला नवी उभारी आणि काम करायला बळ देतं.” अशी त्यांची नेहमी भावना असते.
हे ही वाचा:
रंग माझा वेगळा’ मालिकेच्या टीमने शिवानी-अंबरचं केलं केळवण; कलाकारांनी शेयर केले फोटो