spot_img
Monday, January 13, 2025

Latest Posts

शपथविधीदिनी मुंबईच्या वाहतुकीत मोठे बदल; वाहतूक पोलिसांकडून परिपत्रक जाहीर

आझाद मैदानावर शपथविधीचा जोरदार तयारी सुरु झाली आहे. या कार्यक्रमादरम्यान होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबई पोलिसांनी एक परिपत्रक जाहीर केले आहे.

मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता संपून उद्या ५ डिसेंबरला मुंबईतील आझाद मैदानावर हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. यावेळी केवळ मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी यांचा हा मुंबई दौरा कमी वेळेसाठी असल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून मिळाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती आहे. तर आझाद मैदानावर शपथविधीचा जोरदार तयारी सुरु झाली आहे. या कार्यक्रमादरम्यान होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबई पोलिसांनी एक परिपत्रक जाहीर केले आहे.

उद्या ५ डिसेंबरला शपथविधी सोहळ्यानिमित्त वाहतुकीत मोठे बदल होणार आहेत. मुंबईतील वाहतूक पोलिसांनी नुकतंच एक परिपत्रक जारी केले आहे. गुरुवारी दुपारी १२ वाजल्यापासून हा कार्यक्रम संपेपर्यंत हे आदेश लागू राहणार आहेत. आझाद मैदान परिसरात पार्किंगची व्यवस्था उपलब्ध नसल्याने शपथविधीसाठी येणाऱ्यांनी लोकलचा वापर करावा, असे मुंबई वाहतूक पोलिसांनी सांगितले. मुंबईतील वाहतूक पोलिसांनी नुकतंच एक परिपत्रक जारी केले आहे.

मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीच्या सोहळ्यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज जंक्शन ते वासुदेव बळवंत फडके चौक दरम्यान दोन्ही मार्ग बंद ठेवले जाणार आहेत. त्यामुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी एल. टी. मार्ग, चकाला जंक्शनवरून उजवे वळण-डी. एन. रोड छत्रपती शिवाजी महाराज जंक्शन या पर्यायी मार्गाचा वापर करावा. तसेच विरुद्ध दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी महात्मा गांधी मार्गही आवश्यकतेनुसार बंद ठेवण्यात येणार आहे. वाहन चालकांनी एल. टी. मार्ग चकाला जंक्शनवरून उजवे वळण – डी. एन रोड, सीएसएमटीवरून मार्गाचा अवलंब करावा, असे वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

Latest Posts

Don't Miss