spot_img
Sunday, February 9, 2025

Latest Posts

आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले; बेस्ट बसचा आणखी एक प्रकार

मुंबईच्या कुर्ला येथे बेस्ट बसचा अपघात काही दिवसांपूर्वी घडला असून आता मुंबईच्या दादर परिसरामध्ये शिवसेना आमदार सुनील शिंदे थोडक्यात बचावले. सुनील शिंदे यांच्या फॉर्च्युनर कराल बेस्ट बसने धडक दिली. या धडकेमध्ये कारच्या समोरच्या भागामध्ये नुकसान झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये बेस्ट बसेसच्या अपघातांची मालिकाच सुरु आहे.

कुर्ला बेस्ट बस अपघात
गेल्यावर्षी मुंबईतील कुर्लामध्ये 9 डिसेंबरच्या रात्री पावणे दहाच्या सुमारास कुर्ला रेल्वे स्थानकाबाहेर भीषण अपघात झाला होता. खासगी बेस्ट बसचे नियंत्रण सुटून रस्त्यावरील अनेक लोक आणि वाहनांना चिरडले होते. या अपघातात 49 जण जखमी झाले असून सात जणांचा मृत्यू झाला होता. 20-25 वाहनेही चक्काचूर झाली होती. अपघातानंतर चालक फरार झाला होता. यानंतर बस ड्रायव्हर आणि कंडक्टरविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला. काही वेळातच दोघांनाही अटक करण्यात आली. विशेष म्हणजे मुंबईत बेस्टच्या बसेसमध्ये दररोज अनेक अपघात होत असून त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शहरातील लाखो लोक रोजच्या प्रवासासाठी बसचा वापर करतात. पूर्वी बस आणि चालक दोन्ही चांगले होते, पण आता आलेल्या चालकांना बस चालवण्याचा अनुभव नाही, असे लोक सांगतात. तसेच या लोकांना जबाबदारी घ्यायची नाही. बसमध्ये बसलेल्या प्रवाशांना गृहित धरले जाते.

हे ही वाचा : 

नागरिकांना शासकीय सेवा मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध करून द्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सहाय्य्क प्राध्यापकाच्या ५०० हुन अधिक जागांची भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss