मागील काही दिवसांपासून मराठी भाषेवरून वादाची ठिणगी सर्वत्र उडत आहे. कल्याण, मुंब्र्यानंतर आता दहिसरमध्ये हा वाद पेटला आहे. ‘आपल्याच महाराष्ट्रात मराठी बोलायची चोरी झाली आहे’. असं म्हटलं तर काही चुकीच नाही. दहिसरमधील दोन परप्रांतीय बाऊन्सर्सनी मराठी बोलण्यास नकार दिल्यामुळे मनसेने चांगलाच त्यांचा समाचार घेतला आहे. त्यांनतर दोन्ही परप्रांतीय बाऊन्सर्सनी मनसे कार्यकर्त्यांसमोर मराठीत माफी मागितली. दहिसर येथील एका हॉटेलमध्ये एक मराठी माणूस गेला होता. तिथे परप्रांतीय बाऊन्सर उभे होते. त्या हॉटेलमध्ये गेलेल्या मराठी माणसात आणि बाऊन्सर्समध्ये मराठी भाषेवरून वाद पेटला. दोन्ही बाऊन्सर्सनी मराठी बोलण्यास आणि समजून घेण्यास नकार दिला. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी दोन्ही बाऊन्सर्सची दखल घेत परप्रांतीय बाऊन्सर्सना मराठीत माफी मागायला लावली.
अशीच एक घटना मुंब्र्यात घडली होती आणि आता त्याची पुनरावृत्ती दहिसरमध्ये घडली आहे. मुंब्र्यात फळ विक्रेत्याकडून फळ घेत असताना मराठी भाषित वादाची घटना घडली होती. त्या मराठी तरुणाने “महाराष्ट्रात रहायचे असेल तर मराठी आलेच पाहिजे, मी मुंब्रा बंद करुन टाकेन”, असं वक्त्यव्य केलं. त्यावेळी त्या फळ विक्रेत्याने स्थानिक रहिवाशांनी एकत्र येवून मराठी तरुणाला घेरलं आणि त्या जमावाने मराठी तरुणाला माफी मागायला लावली.
कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला मारहाण
त्याआधी मागच्यावर्षी डिसेंबर महिन्यात कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला मारहाण झाली होती. कल्याण पश्चिमेला उच्चभ्रू सोसायटीत वाद झाला होता. दोन अमराठी कुटुंबामध्ये वाद झाला असता या दोन अमराठी कुटुंबियांच्या भांडणार आशिष देशमुख यांनी मध्यस्ती करत समजूत घालण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी एका अमराठी महिलेने वाद वाढवत मराठी लोक भिकारडे असतात असे वादग्रस्त वक्त्यव्य केले. चिकन मटन खावून घाण करणारे आहात, असे संतापजनक शब्द वापरले. यावेळी या अमराठी कुटुंबाने बाहेरुन गुंड बोलावले व मराठी कुटुंबियांच्या घरात घुसून लोखंडी रॉडने मारहाण केली होती.
हे ही वाचा :
घरच्याघरी पारंपरिक पद्धतीने हुरड्याचे थालीपीठ कधी खाल्ले आहे का? जाणून घ्या सोपी पद्धत