मुंबईसह संपूर्ण राज्यात निवडणुकांची जोरदार धामधूम ही सुरू आहे. निवडणुकांचा रणसंग्राम आता जोरदार सुरू झाला आहे. संपूर्ण राज्यभरात दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुका या पार पडणार आहेत. आणि पुढे ३ दिवसांनीच म्हणजेच २३ नोव्हेंबर २०२४ रोजी या निवडणुकांचा निकाल हा जाहीर होणार आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी प्रचार तोफांचा झंझावात हा सुरू होता. जोरदार प्रचार आता सगळ्याच पक्षांकडून सुरू होते. आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर अवघ्या काही तासांत सर्व प्रचारसभा या बंद होणार आहेत. आज लालबागमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांच्या प्रचारार्थ मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सभा घेतली आहे.
बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांना व्हीलचेअरवर बघून मला जनता पक्षाचा काळ आठवला. जयप्रकाश असेच भाषण करायचे. विधानसभेची आज माझी ही शेवटची सभा आहे. प्रत्येकवेळी शेवटची सभा इकडेच असते. २० तारखेला मतदान असणार आहे. त्यावेळी 2 नंबरवर असलेल्या बाळा नांदगावकरांना एक नंबरवर आणायची जबाबदारी तुमच्यावर आहे, असं मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सांगितलं. शिवडीतील उमेदवार बाळा नांदगावकर यांच्या प्रचारार्थ राज ठाकरेंनी आज जाहीर सभा घेतली.
“आज महाराष्ट्रात अनेक प्रश्न खोळंबलेले आहेत. महाराष्ट्रात अनेक लोकांना भेटलो. अत्यंत वाईट परिस्थिती महाराष्ट्रातील आहे. चालायला फुटपाथ मिळत नाही, गाडी चालवायला रस्ते मिळत नाही. हॉस्पिटमध्ये बेड मिळत नाही, रोजगार नाही. ग्रामीण महाराष्ट्रातील मुलं शहरात येतात. मुंबई-पुण्यातील मुलं परदेशात जाण्याचा विचार करतात. अनेक विषय आहेत, ज्याची सोडवणूक झालेली नाही” असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले. ते लालबाग मेघवाडी येथे शेवटच्या प्रचारसभेत बोलत होते.
शिवडी विधानसभा मतदारसंघात भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने आमच्या बाळा नांदगावकर यांना पाठिंबा दिल्याने मी त्यांचे आभार मानतो. असे आभार अनेक मतदार संघात मानता आले असते… पण जाऊदेत, असं राज ठाकरे म्हणाले. महाराष्ट्राचा एकोपा होता. पण आपण सर्व विसरलो, का तर यांच्या स्वार्थासाठी, असंही राज ठाकरेंनी सांगितले.
हे ही वाचा:
मनोज जरांगेनी सांगितले, विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला किंवा अपक्षाला पाठिंबा…
अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना दिले थेट आव्हान…, म्हणाले…