spot_img
Wednesday, February 19, 2025

Latest Posts

मराठीच्या मुद्द्यावरून मनसे पुन्हा एकदा आक्रमक; Ameya Khopkar हॉटस्टारच्या कार्यालयात दाखल

मराठी समालोचनाच्या मुद्द्यावरून मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठी समलोचनाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आज २७ जानेवारीला हॉटस्टारच्या लोअर परळ येथील कार्यालयात येऊन धडकले.

मराठी समालोचनाच्या मुद्द्यावरून मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठी समलोचनाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आज २७ जानेवारीला हॉटस्टारच्या लोअर परळ येथील कार्यालयात येऊन धडकले. हॉटस्टारवर मराठी समालोचन का नाही? यावरून मनसे नेते अमेय खोपकर यांनी हॉटस्टारच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. अमेय खोपकर यांच्यासोबत संतोष धुरी, केतन नाईक हे देखील हॉटस्टारच्या कार्यालयात उपस्थित होते.

चॅम्पियन ट्रॉफीचे मराठीतून समालोचन का नाही? असा माणसे नेत्यांचा सवाल आहे. अशातच मनसे नेते अमेय खोपकर यांनी मंत्री उदय सामंत याना फोन लावला आणि हॉटस्टारच्या अधिकाऱ्यांकडून मराठी भाषेची अंमलबजावणी होईल असे लेखी पत्र द्या अशी मागणी केली. उद्या सामंत यांनी मनसेच्या मागणीला पूर्ण पाठिंबा दिला. संजोग गुप्ता कुठे आहे त्याला तुम्ही बोलवा किंवा आम्ही जाऊन आणू असे मनसे नेते म्हणाले. यावर उदय सामंत म्हणाले,”मराठी भाषेची कॉमेंट्री का असू नये? हे कोण ठरवणारे, बाकीच्या भाषांची असावी आणि मराठीची नसावी, बाकीच्या भाषांचा आदर आहेच. पण मराठीत कॉमेंट्री असावी हे शंभर टक्के बरोबर आहे”. त्यावर “साहेब मी इथून पत्र घेऊन निघतो, काही असेल तर फोन करतो”, असे अमेय खोपकर म्हणाले.

अमेय खोपकर यांनी हॉटस्टारच्या अधिकाऱ्यांना सांगितले की, “आता मंत्री महोदयांनी सांगितलं, सांगा आता काय करायचं? तुम्हाला काय मदत लागेल ते सांगा, मी सर्व मदत करायला तयार आहे.” मी प्रोडक्शनमध्ये नाही, पण स्टुडिओ सेटअप करायला काही दिवस लागतील, असे समोरच्या अधिकाऱ्याने सांगितले. त्यावर अमेय खोपकर यांनी प्रतिक्रिया दिली की, दोन दिवसाचं काम नाही, काय मोठा सेटअप लागतो. स्टेडीअममध्ये माणसं कॉमेंट्रीसाठी बसत नाही, स्टुडिओत बसतात. दोन दिवस पण लागत नाही. मला लेखी द्या, मी निघालो , असे अमेय खोपकर म्हणाले.

हे ही वाचा : 

Latest Posts

Don't Miss