spot_img
Monday, January 20, 2025

Latest Posts

Mumbai Boat Accident : मुंबई बोट दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या 7 वर्षाच्या मुलाचा शोध सुरू, आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू…

मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाजवळ बुधवारी (१८ डिसेंबर) नौदलाची बोट आणि प्रवासी बोट 'नीलकमल' यांच्यात झालेल्या धडकेनंतर बेपत्ता झालेल्या सात वर्षांच्या मुलाचा शोध घेण्याची मोहीम शुक्रवारी (१८ डिसेंबर) सुरूच राहिली

मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाजवळ बुधवारी (१८ डिसेंबर) नौदलाची बोट आणि प्रवासी बोट ‘नीलकमल’ यांच्यात झालेल्या धडकेनंतर बेपत्ता झालेल्या सात वर्षांच्या मुलाचा शोध घेण्याची मोहीम शुक्रवारी (१८ डिसेंबर) सुरूच राहिली. मंगळवारी सायंकाळी ४३ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह सापडल्याने या घटनेतील मृतांची संख्या १४ झाली आहे.

हार्बर परिसरात घडलेल्या या घटनेची नौदलाने चौकशी सुरू केली आहे. शोध आणि बचाव मोहिमेचा एक भाग म्हणून, बेपत्ता प्रवाशांच्या शोधासाठी नौदलाचे हेलिकॉप्टर आणि बोटी तसेच तटरक्षक दल तैनात करण्यात आले आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. दोन्ही बोटींमधील ११३ जणांपैकी १४ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ९८ जण जखमी झाले आहेत. अधिकाऱ्याने सांगितले की, नौदलाच्या बोटीवर सहा जण होते, त्यापैकी दोन जण सुखरूप बचावले आहेत. नौदलाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नौदलाचे जहाज बुधवारी इंजिन चाचणीसाठी जात होते, मात्र त्यानंतर दुपारी ४ वाजता त्याचे नियंत्रण सुटले आणि कारंजाजवळ ‘नीलकमल’ नावाच्या बोटीला धडकले. ही बोट गेटवे ऑफ इंडिया येथून प्रसिद्ध पर्यटन स्थळ ‘एलिफंटा’ बेटावर १०० हून अधिक प्रवाशांना घेऊन जात होती. नौदलाचा एक कर्मचारी आणि दोन कंत्राटी कामगारांसह १४ जणांचा मृत्यू झाला. सुमारे ९८ जणांना वाचवण्यात यश आले.

पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने (एमएमबी) जारी केलेल्या कागदपत्रांनुसार, बोटीला 84 प्रवासी आणि सहा क्रू मेंबर्स वाहून नेण्याची परवानगी होती, परंतु तिच्या क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी होते . अधिकाऱ्याने सांगितले की, कुलाबा पोलिस ठाण्यात बोट चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबीयांना पंतप्रधान मोदींनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तर जखमींना ५० हजार रुपये देण्यात येणार आहेत. शोकग्रस्त कुटुंबांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी 5 लाख रुपयांची सानुग्रह रक्कम दिली जाईल.

हे ही वाचा:

Eknath Shinde Live: विधानसभेत मिळालेला विजय ऐतिहासिक, मी कॉमन मॅन म्हणून….काय म्हणाले एकनाथ शिंदे?

लोकसभेच्या निवडणूकीतून आम्ही जे शिकलो तसं महाविकास आघाडीने शिकलं पाहीजे: Chandrashekhar Bawankule

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss