अंधेरीतील वालिया कॉलेजसमोरील गणेश मंदिराच्या वरच्या मजल्यावर गुलाबी शेट्टी ही वयोवृद्ध महिला एकाकी जीवन जगत होती. तिचा पती नारायण शेट्टी यांचा दारूचा व्यवसाय होता. त्यांची १९७५ मध्ये त्यांची हत्या झाली होती. गुलाबी यांना एक विवाहित मुलगी असून ती अंधेरीतील चार बंगला परिसरात राहते. २४ फेब्रुवारीला दुपारी तीन वाजता त्यांची भाची सुजाता पुरंदर शेट्टी यांनी गुलाबी यांना फोन केला असता; मात्र त्यांनी फोन घेतला नाही. वारंवार फोन केल्यांनतर त्या फोन घेत नव्हत्या. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्या घरी गेल्या. या वेळी त्यांना गुलाबी यांचे हातपाय बांधलेले आणि साडीने गळा आवळून हत्या केल्याचे दिसून आले. त्यांचा मृतदेह बाथरुममध्ये पडला होता. या घटनेनंतर त्यांनी पोलिसांना ही माहिती दिली. या माहितीनंतर डी. एन. नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून आरोपींचा शोध सुरू केला होता. गेल्या अनेक महिन्यांपासून पोलिस आरोपींच्या मागावर होते. हा तपास सुरू असतानाच वांद्रे आणि कोलकाता येथून शनिवारी रशेदुल शेख आणि नूरअली सत्तार या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. प्राथमिक तपासात त्यांचा या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस येताच त्यांना पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत ते दोघेही सध्या पोलिस कोठडीत आहे. त्यांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अंधेरी येथे राहणाऱ्या गुलाबी नारायण शेट्टी या ७५ वर्षांच्या वृद्ध महिलेच्या हत्येप्रकरणी दोन संशयित आरोपींना डी. एन. नगर पोलिसांनी अटक केली आहे. रशेदुल जोहाद शेख आणि नूरअली अब्दुल सत्तार अशी या दोघांची नावे असून ते दोघेही वांद्रे येथील शास्त्रीनगरचे रहिवासी आहेत. अटकेनंतर या दोघांनाही वांद्रे येथील लोकल कोर्टाने १५ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या दोघांच्या अटकेला वरिष्ठ पोलिस निरीक्षक परमेश्वर गणमे यांनी दुजोरा दिला असून या दोघांची चौकशी सुरू असल्याने अधिक तपशील सांगण्यास नकार दिला.
हे ही वाचा :
जिथे राम तिथे अयोध्या, जिथे तुम्ही तिथे माझी दिवाळी – नरेंद्र मोदी
आमदार रत्नाकर गुट्टे यांना मराठा आंदोलनाचा फटका