Saturday, April 20, 2024

Latest Posts

माजी महापौर Vishwanath Mahadeshwar यांचं निधन, ६३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

आताच्या घडीची सर्वात मोदी बातमी ही समोर येत आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते, तसेच मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर (Vishwanath Mahadeshwar) यांचे निधन झाले आहे.

आताच्या घडीची सर्वात मोदी बातमी ही समोर येत आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते, तसेच मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर (Vishwanath Mahadeshwar) यांचे निधन झाले आहे. ह्दयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले आहे. विश्वनाथ महाडेश्वर यांनी वयाच्या ६३ व्या वर्षी अखेरचा श्र्वास घेतला. आज दिनांक ९ मे रोजी त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी सांताक्रूझ पूर्व (Santacruz), पटेल नगर सर्विस रोड येथील राजे संभाजी विद्यालयात दुपारी २ वाजता ठेवण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे, त्यानंतर दुपारी ४ वाजता अंत्ययात्रा टीचर्स कॉलोनी येथील स्मशान भूमीच्या दिशेने निघेल.

मागच्या आठवड्यात विश्वनाथ महाडेश्वर हे त्यांच्या गावाला होते. चार दिवसांपूर्वी ते मुंबईत आले होते. काल रात्री त्यांना ज्यावेळी त्रास जाणवू लागला, त्यावेळी त्यांना तात्काळ व्हि एन देसाई या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती त्यांच्या जवळच्या सहकार्यांनी दिली आहे. ह्दयविकाराच्या झटक्याने विश्वनाथ महाडेश्वर यांचं निधन झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. विश्वनाथ महाडेश्वर यांचे नातेवाईक परशुराम तानावडे यांनी सांगितले की, आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता, त्यांची मुलगी रात्री लग्नाचा वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गेली असता तिने वडील बेशुद्ध पडलेले पाहिले, त्यानंतर त्यांना व्हीएन देसाई रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

विश्वनाथ महाडेश्वर कोण होते?

विश्वनाथ महाडेश्वर यांचा जन्म १५ एप्रिल १९६० रोजी झाला. त्यांनी मुंबईच्या रुईया कॉलेजमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. ते सांताक्रूझ येथील राजे संभाजी विद्यालयाचे माजी प्राचार्यही होते. २००२ मध्ये महाडेश्वर प्रथमच नगरसेवकपदी निवडून आले. त्यानंतर ते २०१७ मध्ये मुंबईचे महापौर झाले. २०१७ ते २०१९ या काळात त्यांनी मुंबईचे महापौर म्हणून काम पाहिले. २०१९ ची विधानसभा निवडणूकही त्यांनी लढवली होती. महाडेश्वर यांचा २०१७ ते २०१९ या काळात मुंबईचा महापौर असा राजकीय प्रवास. स्थायी समितीचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले. ते शिक्षण समितीचे अध्यक्षही राहिले आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत वांद्रे पूर्व मतदारसंघातून त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे वास्तव्य हाच मतदारसंघ आहे.

हे ही वाचा : 

मॉडेल सीएना वीरचं वयाच्या २३ व्या वर्षी निधन

‘द केरला स्टोरी’ चित्रपटाची पहिल्याच दिवशी ७.५ कोटींची कमाई

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss