Mumbai Local : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथील २४ डब्यांच्या गाड्यांसाठी प्लॅटफॉर्मचा विस्तार करण्यासाठी मध्य रेल्वेने शुक्रवारी-शनिवारी पाच तासांचा आणि शनिवारी-रविवारी रात्री १० तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार असल्याने मध्य रेल्वेच्या तब्ब्ल ५९ लोकल रद्द आणि ३ मेल एक्स्प्रेस गाड्या रद्द असणार आहे. या कामामुळे अनेक उपनगरीय आणि लांब पल्ल्याच्या लोकांना त्रास होणार असल्याचे, एका अधिकाऱ्याने सांगितले. सीएसएमटी स्थानकात २४ डब्यांचा रेल्वे गाड्यांसाठी फलाट क्रमांक १२ आणि १३ च्या विस्तारीकरासंदर्भात प्री नॉन- इंटरलॉकिंग (Pre Non- Interlinking) काम पूर्ण करण्यासाठी दोन दिवस ब्लॉकची घोषणा करण्यात आली आहे.
दोन ब्लॉक घेण्यात आलेला “पहिला टप्पा शुक्रवारी रात्री ११.३० वाजता सुरू होईल आणि शनिवारी पहाटे ४.३० वाजता संपेल. १० तासांचा हा टप्पा शनिवारी रात्री ११:१५ ते रविवारी सकाळी ९:१५ वाजेपर्यंत असेल,” असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील निला यांनी सांगितले. २४ डब्यांच्या गाड्या सामावून घेण्यासाठी, क्षमता वाढवण्यासाठी आणि प्रवाशांच्या सोयीसाठी १२ आणि १३ क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मचा विस्तार करण्यासाठी हा विशेष ब्लॉक आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते भायखळा अप-डाउन जलद आणि हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते वडाळा रोड दरम्यान हा ब्लॉक असणार आहे. या ब्लॉक कालावधीत उपनगरीय लोकल सेवा उपलब्ध नसणार आहे. मुख्य मार्गावरील लोकल सेवा भायखळा, परळ, दादर स्थानकांपर्यत चालविण्यात येणार आहे. तर हार्बर मार्गावरील लोकल वडाळा रोडपर्यत चालविण्यात येणार आहे
या कामात बेट प्लॅटफॉर्म १२ आणि १३ हे ५१० मीटरवरून ६९० मीटरपर्यंत वाढवणे समाविष्ट आहे आणि त्यात ३१ ओव्हरहेड केबल्सचे स्थलांतर, ३४ सिग्नल सिस्टीम जोडणे आणि ५०० मीटर नवीन ट्रॅक टाकणे समाविष्ट आहे. २०२३-२४ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात मंजूर झालेल्या ६२.१८ कोटी रुपयांच्या प्रकल्पाचा भाग असलेल्या या प्लॅटफॉर्म विस्तारामुळे सीएसएमटी येथे ८-९ क्रमांक वगळता सर्व मुख्य मार्गावरील प्लॅटफॉर्मवर २४ कोच गाड्या सामावून घेता येतील याची खात्री होईल. जागेच्या कमतरतेमुळे प्लॅटफॉर्म ८ आणि ९ वाढवता येणार नाही. “मुख्य आणि हार्बर कॉरिडॉरवर दोन्ही दिवशी एकूण ५९ उपनगरीय सेवा रद्द राहतील, तर शनिवार आणि रविवारी सहा लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द राहतील.
“पुणे-सीएसएमटी डेक्कन, पुणे-सीएसएमटी इंटरसिटी आणि नांदेड-सीएसएमटी तपोवन शनिवारी रद्द राहतील, तर सीएसएमटी-पुणे डेक्कन, सीएसएमटी-पुणे इंटरसिटी आणि सीएसएमटी-नांदेड तपोवन शनिवारी रद्द राहतील,” असे निला यांनी सांगितले. ब्लॉकमुळे इतर अनेक उपनगरीय आणि लांब पल्ल्याच्या गाड्या एकतर शॉर्ट टर्मिनेटेड, शॉर्ट ओरिजिनेट किंवा वळवल्या जातील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या कामामुळे, मध्य रेल्वेने रविवारचा नियमित मेगा ब्लॉक रद्द केला आहे. शनिवारी सीएसएमटी स्थानकांवरून शेवटची धीमी लोकल रात्री १०.४६ वाजताची सीएसएमटी-ठाणे धीमी लोकल असणार आहे. तर शेवटची जलद लोकल रात्री १०.४१ वाजताची सीएसएमटी- बदलापूर लोकल असणार आहे. तर हार्बर मार्गावरील शेवटची लोकल रात्री १०.३४ वाजताची सीएसएमटी-पनवेल लोकल तर, रात्री ११.२४ सीएसएमटी- गोरेगाव लोकल धावणार आहे. ब्लॉकमुळे शनिवारी-रविवारी ट्रेन क्रमांक ११००८/०७ पुणे-सीएसएमटी डेक्कन एक्स्प्रेस, ट्रेन क्रमांक १२१२८/२७ पुणे-सीएसएमटी इंटरसिटी एक्स्प्रेस आणि ट्रेन क्रमांक १७६१८/१७ नांदेड- सीएसएमटी तपोवन एक्स्प्रेस रद्द असणार आहेत.
हे ही वाचा:
Raj Thackeray: मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पुस्तक प्रदर्शन
Follow Us