Mumbai Local : मुंबई करांची लाईफलाईन असलेली मध्य रेल्वे डाउन च्या दिशेने येणाऱ्या गाड्या पूर्णपणे ठप्प करण्यात आली आहे. टिटवाळा-खडवली (Titwala- Khadavli) दरम्यान मालगाडीचे कपलिंग तुटल्याने मध्य रेल्वे विस्कळीत झाली आहे. यामुळे डाऊन दिशेच्या सर्वच लोकल गाड्या पूर्णपणे बंद झाल्या असून प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.सकाळी चाकरमान्यांची गर्दी असताना रेल्वेने प्रवास प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली आहे. कसाऱ्याहून येणारी “गरीब रथ मेल” (Garib Rath) आसनगावला (Asangaon) थांबवण्याची शक्यता आहे.
दरम्यान कसारा लोकलचा (Kasara Local) प्लॅटफॉर्म ओव्हरशूट झाल्याची घटना समोर आली आहे. मुलुंड स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वरून लोकल दोन डबे पुढे गेली. हा संपूर्ण प्रकार मंगळवारी सकाळी ९ वाजून २३ मिनिटांनी घडला, त्यानंतर लोकल १० मिनिटं खोळंबली होती. त्यामुळे काही प्रवाशांना रुळांवर उतरून प्लॅटफॉर्मवर यावे लागले, तर मागच्या डब्यांतील प्रवाशांना गाडीत चढणे अतिशय कठीण झाले. गर्दीच्या वेळेस हा प्रकार झाल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. मोटरमन के.जी. भावसार आणि ट्रेन मॅनेजर व्ही. सिंगापूर यांनी ही लोकल चालवली होती. मोटरमन ब्रेक वेळेवर न लावल्याने लोकल नियोजित ठिकाणी न थांबता पुढे गेल्याचे समोर आले आहे. प्लॅटफॉर्म ओव्हरशूट हा गोंधळाचा प्रकार असला तरी Signal Passing at Danger (SPAD) पेक्षा कमी धोकादायक आहे. या घटनेच्या चौकशीचे आदेश रेल्वे प्रशासनाने दिले असून भविष्यातील उपाययोजनांवर भर देण्यात येणार आहे.
रेल्वेकडून मालगाडीचे कपलिंग दुरूस्तीचे काम तातडीने करण्यात येत आहे. डाऊन दिशेने जाणाऱ्या सर्व गाड्या ठप्प करण्यात आल्या आहेत. याबद्दल सोशल मीडियावर प्रवाशांनी आपला राग व्यक्त केला आहे. गुरुवारी कामावर जाणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रासाचा सामना करावा लागलाय. गर्दीच्या वेळीच मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाल्यामुळे लोकांना कामावर जाण्यास विलंब होत आहे. टिटवाळा-खडवली दरम्यान मालगाडीचे कपलिंग तुटल्याने मध्य रेल्वे विस्कळीत झालेली आहे. त्यामुळे डाऊन मार्गावरच्या सर्वच लोकल गाड्या सध्या पूर्णपणे बंद झाल्या आहेत, त्यावर रेल्वेकडून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.