spot_img
Friday, March 21, 2025

Latest Posts

Mumbai Shivneri Bus Accident : होळी उत्सवासाठी फुले आणायला गेलेल्या तिघांचा मुंबईत प्रभादेवी ब्रिजवर भीषण अपघात

बेधडकपणे गाडी चालवणाऱ्या शिवनेरी बस चालकाने तिघांना चिरडल्याची घटना मुंबईतील प्रभादेवी ब्रिजवर मध्यरात्री २:३० वाजता घडली. मुंबईतील कुर्ला येथे बेस्टच्या बसने पादचाऱ्यांना चिरडल्याची घटना तीन महिन्यांपूर्वी घडली होती. या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला होता.

Mumbai Shivneri Bus Accident : बेधडकपणे गाडी चालवणाऱ्या शिवनेरी बस चालकाने तिघांना चिरडल्याची घटना मुंबईतील प्रभादेवी ब्रिजवर मध्यरात्री २:३० वाजता घडली. मुंबईतील कुर्ला येथे बेस्टच्या बसने पादचाऱ्यांना चिरडल्याची घटना तीन महिन्यांपूर्वी घडली होती. या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला होता. आता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एमएसआरटीसी) बसने मुंबईतील प्रभादेवी भागात तिघांना धडक दिली. या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत.

समोरून शिवनेरी बस चालक ब्रिजवरून चुकीच्या दिशेने भरधाव वेगाने आला. आणि त्याने तिघांना चिरडले. प्रणय बोडके (२९), करण शिंदे (२९) आणि दुर्वेश गोरडे हे तिघे दुचाकीवरून दादरच्या फुल बाजराता फुले आणण्यासाठी जात होते. होळीच्या पूजेसाठी त्यांना फुलं हवी होती. त्याचवेळी प्रभादेवी पुलावर समोरून शिवनेरी बस चुकीच्या दिशेने भरधाव वेगात आली. या बसने प्रणयच्या दुचाकीला धडक दिली. त्यानंतर स्थानिकांनी या तिघांना केईएम रुग्णालयात नेलं. प्रणयचा रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू झाला. तर, दुर्वेश व करण गंभीर जखमी असून त्यांच्यावर ग्लोबल रुग्णालयात उपचार चालू आहेत.

दरम्यान, इकबाल शेख असे चालकाचे नाव असून तो MSRTC ची निळ्या रंगाची बस MH12VF3305 चालवत होता. बस चालक इक्बाल शेख याला अटक करण्यात आली आहे. अपघातानंतर स्थानिकांनीच त्याला पकडून भोईवाडा पोलिसांच्या ताब्यात दिलं. या अपघातात प्रणय बोडके या तरुणाचा मृत्यू झाला आहे. प्रणयच्या मागे त्याची पत्नी, आई, वडील व दीड वर्षांचा मुलगा असं कुटुंब आहे. प्रणय हा त्याच्या घरातील एकटाच कमावणारा होता. त्याचं कुटुंब काळाचौकी येथील ऐक्यदर्शन सोसायटी येथे वास्तव्यास आहे. तो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाच्या सोशल मीडिया विभागात काम करत होता.

हे ही वाचा : 

Holi 2025: युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी होळी निमित्त ‘आई माऊलीचा उदो उदो’ गाण्यावर धरला ठेका

Pankaja Munde On Santosh Deshmukh Murder Case: सुरेश धसांच्या आरोपांवर पंकजा मुंडेंच थेट प्रत्युत्तर म्हणालया, मी भाजपाची राष्ट्रीय नेता असताना…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss