Friday, April 26, 2024

Latest Posts

मुंबईकरांनो घराबाहेर पडण्याचा विचारात असाल तर एकदा रेल्वेचे वेळापत्रक नक्की पहा

मुंबईकरांनो रविवारी घराबाहेर पडण्याचा विचार करत असाल तर मुंबई लोकलचे वेळापत्रक एकदा पाहून घ्या कारण आज देखभालीच्या कामासाठी मुंबईमध्ये मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मुंबईकरांनो रविवारी घराबाहेर पडण्याचा विचार करत असाल तर मुंबई लोकलचे वेळापत्रक एकदा पाहून घ्या कारण आज देखभालीच्या कामासाठी मुंबईमध्ये मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. आज सर्वात महत्त्वाचे म्हणजेच सीएसएमटी ते पनवेल या मार्गांवरची वाहतूक बंद राहणार आहे. सकाळी ११.३० ते दुपारी ४.३० पर्यंत सीएसएमटी हून पनवेल साठी एकही लोकल सुटणार नाही. परंतु पनवेल ते वाशी आणि सीएसएमटी ते कुर्ला अशा विशेष लोकल चालवल्या जाणार आहेत. म्हणूनच जर तुम्ही रविवारी घराबाहेर पडायचा विचार करत असाल तर तुम्ही तुमच्या प्रवासाचे नियोजन तुम्हाला आधीच करून घ्यायला हवे. रेल्वेच्या देखभालीचे काम रुळाचा दुरुस्तीच्या कामासाठी आणि सिग्नल यंत्रणेतील विविध कामांसाठी रेल्वे कडून आज मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. या मेगाब्लॉकमुळे मध्य रेल्वे हार्बर मार्गावरच्या लोकल वाहतुकींवर परिणाम होणार आहे या कालावधीत प्रवाशांना ठाणे ते वाशी मार्ग म्हणून प्रवास करण्याची मुभा असणार आहे.

मध्य रेल्वेचे वेळापत्रक –

तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वडाळा रोड येथून सकाळी 10.48 ते सायंकाळी 4.43 वाजेपर्यंत वांद्रे, गोरेगाव करीता सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.पनवेल, बेलापूर, वाशी येथून सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 पर्यंत येथून १०.२५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकादरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. ठण्यावरून सकाळी १०.५० ते दुपारी ३.४६ वाजेपर्यंत अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा या स्थानकांच्या दरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत.

हार्बर मार्गावरचे वेळापत्रक –

हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४० पर्यंत मेगब्लॉक घेण्यात येणार आहे. सीएसएमटी ते वडाळा रोड येथून सकाळी ११.१६ ते सायंकाळी ४.४७ या वेळेमध्ये त्याचबरोबर वाशी, बेलापूर , पनवेल करीता सुटणारी रेल्वेसेवा रद्द करण्यात आल्या आहेत. सीएसएमटी ते वडाळा रोड येथील सकाळी १०.४८ ते सायंकाळी ४.४३ वाजेपर्यंत वांद्रे, गोरेगाव करीता सुटणारी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहणार आहेत. पनवेल, बेलापूर, वाशी येथील येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत सीएसएमटी मुंबईसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील रेल्वेसेवा आणि गोरेगाव, वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत सीएसएमटी मुंबईसाठी सुटणारी हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा बंद राहणार आहेत. त्याचबरोबर ब्लॉक कालावधीमध्ये पनवेल ते कुर्ला दरम्यान सेवा सुमारे २० मिनिटांच्या अंतराने चालवल्या जाणार आहेत. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी आहे.

हे ही वाचा : 

भारतीय हवामानशास्त्र विभागाने पुण्यामध्ये गारपिटीसह पावसाची शक्यता वर्तविली

गौतमी पाटील चक्क बावऱ्या नावाच्या बैलासमोर लचकत, मुरडत नाचली video viral

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss