Friday, December 1, 2023

Latest Posts

मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा, ‘या’ भागात असेल पाणीपुरवठा बंद

मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा, 'या' भागात असेल पाणीपुरवठा बंद

मुंबईतील काही भागात २ आणि ३ नोव्हेंबर रोजी पाणीपुरवठा बंद असणार आहे, त्यामुळे मुंबईकरांनी पाणी जपून वापरायचं आवाहन मुंबई महानगरपालिका (BMC) प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. तसेच दक्षिण मुंबईत देखील काही रुग्णालयात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दक्षिण मुंबईतील केईएम रुग्णालय, बाई जेरबाई वाडिया,टाटा, एमजीएम रुग्णालयात पाणीपुरवठा बंद असणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मुंबईतल्या काही विभागांमध्ये जलवाहिनी दुरुस्तीचं काम हाती घेण्यात येणार आहे. याअंतर्गत ९०० मिली मीटर व्यासाचा जलद्वार बदलण्याचं तसेच ३०० ते १८०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीवरील गळती दुरुस्तीच काम करण्यात येणार आहे. त्यामुळे, गुरुवार, दिनांक २ नोव्हेंबर २०२३ पहाटे ४ वाजेपासून ते शुक्रवार, दिनांक ३ नोव्हेंबर २०२३ रोजी पहाटे ४ वाजेपर्यंत एम (पूर्व), एम (पश्चिम), एन, एल, एफ (दक्षिण) आणि एफ (उत्तर) विभागातील काही परिसरात पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील.

मुंबईतीलय नेमक्या कोणत्या विभागात पाणीपुरवठा बंद राहणार?

मानखुर्द, चेंबुरमधील काही भागांत असेल पाणीपुरवठा बंद –

मुंबईतील एम/पूर्व विभागात अहिल्याबाई होळकर मार्ग, मंडाला, कमलरामन नगर, म्हाडा इमारती, आदर्श नगर, जनता टिंबर मार्ट परिसर, रमण मामा नगर, अब्दुल हमीद मार्ग, लोटस कॉलनी, जनकल्याण सोसायटी, मानखुर्द, देवनार फार्म मार्ग, बोरबादेवी, पांजारापोळ भागांत पाणीपुरवठा बंद असणार आहे.

एम / पश्चिम विभागात वैभव नगर, सुभाष नगर, चेंबूर गावठाण, सिद्धार्थ कॉलनी, स्वस्तिक पार्क, चेंबूर कॅम्प, लालडोंगर, युनियन पार्क, लालवाडी, मैत्री पार्क, सुमन नगर, अतूर पार्क, साईबाबा नगर, घाटला, अमर नगर,श्यामजीवी नगर, मोतीबाग, खारदेव नगर, वैभव नगर, रस्ता, उमरशीन बाप्पा चौक, चेंबूर नाका, चेंबूर बाजार, चेंबूर कॅम्प एस. टी. मार्ग, सी. जी. गिडवाणी परिसरात पाणीपुरवठा पूर्णपणे बंद असणार आहे.

घाटकोपरमध्ये पाणीपुरवठा बंद-

एन विभागात घाटकोपर पूर्वेतील राजावाडी पूर्वेकडील संपूर्ण परिसर, चित्तरंजन नगरसह विद्याविहार परिसर, राजावाडी रुग्णालय, नायडू कॉलनी, शास्त्रीनगर गरोडिया नगर,, गुरुनानक नगर, गौरीशंकर मार्ग, जवाहर मार्ग, रमाबाई नगर, कामराज नगर, नेताजी नगर, चिरागनगर, आझाद नगर, गणेश मैदान पारशीवाडी, भीमनगर, पवार चाळ, गिगावडी, लोअर भीमनगर, गुन्हे शाखा परिसर, वैतागवाडी,सीजीएस कॉलनी, गंगावाडी, नित्यानंद नगर, एमटीएनएल गल्ली, एजीएलआर मार्ग, एलबीएस मार्गालगतचा परिसर घाटकोपर (पश्चिम) येथील श्रेयस सिग्नल,, एलबीएस मार्ग घाटकोपर (पश्चिम) इत्यादी पर्यंत. सॅनिटोरियम गल्ली, एच. आर. देसाई मार्ग, कामा गल्ली, श्रद्धानंद रस्ता, गोपाळ गल्ली, जे. व्ही. मार्ग,, गांधी नगर शेजारील परिसरात पाणीपुरवठा बंद असणार आहे.

कुर्ला, टिळक नगर, चुनाभट्टी परिसरात पाणीपुरवठा बंद-

एल विभागात नेहरू नगर, शिवसृष्टी मार्ग,मदर डेअरी मार्ग, नाईक नगर, एस. जी. बर्वे मार्ग कुर्ला (पूर्व), नवरे बाग, कामगार नगर, केदारनाथ मंदीर मार्ग, पोलीस वसाहत, लोकमान्य टिळक टर्मिनस, टिळक नगर, तक्षशिला नगर, चाफे गल्ली, कुरेशी नगर,स्थानक मार्ग, राहुल नगर, एवरद नगर, पानबाजार, त्रिमूर्ती मार्ग, व्ही. एन. पुरव मार्ग, उमरवाडी मार्ग, अलीदादा मार्ग, चुनाभट्टी फाटक, म्हाडाकोळ प्रेम नगर,स्वदेशी जेवण चाळ, हिल रोड, मुक्तता देवी मार्ग, ताडवाडी, समर्थ नगर या भागात पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील.

सायन, माटुंगा, दादर या परिसरात पाणीपुरवठा बंद-

एफ/उत्तर विभागात शीव पश्चिम आणि पूर्व, , माटुंगा (पूर्व),दादर (पूर्व) वडाळा, प्रतीक्षा नगर, शास्त्री नगर, चुनाभट्टीचा भाग, अल्मेडा कंपाऊंड, पंचशील नगर, वडाळा ट्रक टर्मिनल, शीव कोळीवाडा-सरदार नगर, लोढा इमारती (नवीन कफ परेड), संजय गांधी नगर, के. डी. गायकवाड नगर, कोरबी मिठागर, वडाळा भागांत पाणीपुरवठा बंद.

लालबाबग, परळ या भागांत पाणीपुरवठा बंद

एफ/दक्षिण विभागात शिवडी, परळ गाव, परळ, लालबाग, काळेवाडी, नायगाव, कॉटन ग्रीन, मिंट कॉलनी, अभ्युदय नगर, दत्ताराम लाड मार्ग, भागांत पाणीपुरवठा बंद असणार आहे.

हे ही वाचा : 

राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांना बैठकीला का बोलावलं नाही? – बाळा नांदगावकर

हिवाळ्यात ‘लसूण’ वाढवेल तुमची रोगप्रतिकारशक्ती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss