spot_img
Wednesday, February 19, 2025

Latest Posts

मुंबईची LifeLine झाली शंभर वर्षाची; पहिल्या विद्युत रेल्वेची जाणून घ्या सविस्तर माहिती

मुंबईची जीवनरेखा म्हणजे LifeLine म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेल्वेने आज शंभरी गाठली आहे. पहिल्या विद्युत उपनगरी रेल्वेगाडीचा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजे (तेव्हाचे व्हीटी) ते कुर्ला अशा १६ किलोमीटरच्या प्रवासाला आज ३ फेब्रुवारी रोजी शंभर वर्षे पूर्ण झाली. या १०० वर्षात भारतीय रेल्वेत अनेक क्रांतीकारी बदल घडले आहेत. भारतात पहिली विजेवर धावणारी ही पहिली लोकल ट्रेन होती. त्यावेळी १.५ केव्ही डीसी ओव्हरहेड वायर प्रणालीचा वापर करण्यात आला. सध्या ३०० किलोमीटर असलेला उपनगरी रेल्वेचा पल्ला शतकोत्तरात ४०० किलोमीटर पार करण्याचे रेल्वे प्रशासनाचे नियोजन आहे.

३ फेब्रुवारी १९२५ या दिवशी कोळशाचे इंजिन मध्य रेल्वेच्या (व्हिक्टोरिया टर्मिनस) ते कुर्ला स्थानक या दरम्यान पहिली उपनगरी रेल्वे विजेवर धावली. या रेल्वेत ८० किलोमीटर प्रति तास वेगानं धावण्याची क्षमता होती. ब्रिटिश काळात लोकलचे चार डबे होते, परंतु ही चार डब्यांची लोकल हार्बर मार्गावर चालत होती. तर मुख्य मार्गावर आठ डब्यांची लोकल धावली होती. त्या लोकलचे डबे हे पोलाद आणि लाकूड यांचा मेळ साधून बनवण्यात आले होते. रेल्वेच्या डब्यांची फ्लोरिंग ही देखील लाकडाची होती. बाकड्यांसाठी पण लाकडू वापरले जात होते. उर्वरित डबा हा पोलादाचा वापर करुन तयार करण्यात आला होता. वाफेच्या इंजिनाच्या तुलनेत विजेवर चालणारे इंजिन जास्त वेगवान होते. वाफेच्या इंजिनाच्या तुलनेत विजेवर चालणारे इंजिन जास्त वेगवान होते. परंतु त्या वाफेच्या इंजिनमुळे प्रदूषण होत असल्याचे समजताच विजेचे इंजिन तयार करण्यात आले.

सद्यस्थितीत मुंबईच्या लोकलमधून ७७ लाखांपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करत असतात. मुंबई उपनगरी रेल्वेवरील मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील सात मार्गांवरील एकूण ३०० किमी मार्गावर उपनगरी रेल्वे धावती आहे. चार डब्यांचा प्रवास आता पंधरा डब्यांपर्यंत येऊन ठेपला आहे. त्याचबरोबर आता वातानुकूलित लोकलही धावत आहे. त्यानुसार नवीन उपनगरी रेल्वेमार्गाचे काम विविध टप्प्यांत सुरू आहे, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. तर मागील काही दशकांत भारताच्या अन्य भागांतून मुंबईत स्थलांतर करणाऱ्या लोकांमुळे मुंबईची लोकसंख्या अफाट वाढली व त्यामुळे लोकल गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी होते. त्याकरिता, या वाढत्या प्रवाशांना सामावून घेण्यासाठी मुंबईत मेट्रो प्रणाली व मोनो प्रणाली सुरु करण्यात आली आहे.

मुंबईतील उपनगरी रेल्वे मार्गाचे सहा मुख्य मार्ग आहेत:

Latest Posts

Don't Miss