श्रावण महिना सुरु झाल्यानंतर आपल्याला चाहूल लागते ती सणांची. हळूहळू सगळ्याचा सन्न्न सुरवात होते. त्यातच आत्त्ता अवघ्या काही दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवासाठी नवी मुंबई महापालिका सज्ज झाली आहे. सर्व कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या १३८ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना महापालिकेने परवानग्या दिल्या आहेत; तर पर्यावरणपूरक गणेश विसर्जन पार पडण्यासाठी महापालिकेने यंदा १३९ कृत्रिम विसर्जन तलावांची निर्मिती केली आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी नवी मुंबई महापालिका, तसेच पोलिस यंत्रणा यांची बैठक घेण्यात आली होती. यावेळी आयुक्तांनी गणेशोत्सवाच्या मंडपासाठी ऑनलाईन परवानगी अर्ज दाखल करणाऱ्या मंडळांचा आढावा घेताना अर्ज भरणा मुदतीच्या अखेरच्या दिवसापर्यंत दाखल झालेल्या २०५ अर्जांपैकी १३८ मंडळांना आतापर्यंत परवानगी देण्यात आल्याची माहिती दिली. आलेल्या अर्जांपैकी २६ अर्ज नामंजूर केले असून ४१ अर्ज प्रलंबित आहेत. त्याचप्रमाणे कोणतेही मंडळ विनापरवानगी राहणार नाही, याची खातरजमा करण्याचे आदेश राजेश नार्वेकर यांनी विभाग अधिकाऱ्यांना दिले.
याचबरोबर नवी मुंबई महापालिका क्षेत्रात एकूण १३९ इतक्या मोठ्या संख्येने कृत्रिम तलावांची आठही विभागांत निर्मिती करण्यात येत आहे. त्यात नैसर्गिक २२ विसर्जन स्थळे, तसेच १३९ कृत्रिम विसर्जन स्थळांवर पोलिसांशी समन्वय राखत योग्य ते नियोजन करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत. श्रीमूर्तींचे आगमन व विसर्जन मार्ग यांची बारकाईने पाहणी करावी. यामध्ये विशेषत्वाने अंतर्गत रस्त्यांप्रमाणेच वाहतूक पोलिस विभागाच्या सूचनेनुसार ठाणे-बेलापूर मार्ग व सायन-पनवेल मार्गावरही दुरुस्ती करावी. आवश्यक वृक्षछाटणी आणि रस्त्यांवरील दिवाबत्ती व्यवस्थेकडेही अधिक काळजीपूर्वक लक्ष देण्याचे सूचित करण्यात आले. सार्वजनिक मंडळांच्या आकाराने मोठ्या श्रीमूर्ती विसर्जित होतात. तसेच विसर्जनासाठी येणाऱ्या श्रीमूर्तींची संख्या जास्त असते. अशा विसर्जनाच्या ठिकाणी तराफ्यांच्या संख्येत वाढ करण्याचे सूचित केले.
तसेच गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नियोजनाचा आढावा घेण्यासाठी झालेल्या बैठकीत महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वय साधण्यात आला. या प्रसंगी ज्या गणेश मंडळांना अद्याप परवानगी मिळालेली नाही, अशा मंडळांनी मंडप उभारण्याचा प्रयत्न केल्यास कारवाई करण्याचे आश्वासन नवी मुंबई पोलिसांमार्फत महापालिकेला देण्यात आले. त्यामुळे मंडप उभारणीसाठी परवानगी बंधनकारक आहे. त्यामुळे नवी मुंबई सह इतर ठिकाणी देखील गणेशोत्सवाची घाई गडबड बघायला दिसत आहे. त्याचबरोबर गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी सुद्धा बाजार सज्ज झाला आहे. त्यामुळे बाजारात सुद्धा बाप्पाच्या सजावटीच्या आणि त्याच बरोबर बापाच्या आकर्षक मुर्त्यू देखील कारखान्यांमध्ये बघायला मिळत आहे.
हे ही वाचा:
बाळासाहेबांच्या विचारामुळे शिवसेनेत आलो नाहीतर … दीपक केसरकरांनी केला दावा
कोकणातील चाकरमान्यांना ६ ट्रेन ३३८ हून अधिक बस गाड्यांची व्यवस्था, आशिष शेलार…