परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या घटनेची माहिती मिळताच सानपाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, अधिक तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. नवी मुंबईमध्ये सानपाडा परिसरात गोळीबार केल्याची माहिती आहे. भर दिवसा नवी मुंबईच्या सानपाडा स्टेशन जवळील डी मार्ट परिसरमध्ये गोळीबार केला, परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या घटनेची माहिती मिळताच सानपाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, अधिक तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. सानपाडा येथे डी मार्ट परिसरामध्ये राजाराम ठोके या व्यक्तीवर फायरिंग केलं आहे. राजाराम ठोके हा एपीएमसी मार्केट मधील कचरा कॉन्ट्रॅक्टर आहे, ठेकेदारी वरून फायरिंग झाली आहे. याचा तपास सुरू आहे. सहा ते सात राऊंड फायर केले आहेत. गंभीर जखमी राजाराम ठोके यांना खाजगी रूग्णालयात उपचारांसाठी दाखल केलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईच्या सानपाडाजवळ डी मार्ट आहे. डी मार्टच्या जवळच आरोपींनी राजाराम ठोके यांच्यावरती गोळीबार केल्याची माहिती आहे. सानपाड्यातील स्टेशन जवळचा रस्ता मोठ्या वर्दळीचा आहे. या रस्त्याचा वापर अनेक नागरिक करत असतात. भर दिवसा हा गोळीबार घडल्यानंतर नागरीकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. गोळीबार करणारे दोन आरोपी होते. गोळीबार केल्यानंतर आरोपी फरार झाले आहेत. पाच ते सहा राऊंड फायर करून आरोपी फरार झाले आहेत, या घटनेत राजाराम ठोके जखमी झाल्याची माहिती समोर आली, सानपाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्या घटनेचा तपास करत आहेत. काही वेळापूर्वीच ही घटना घडली.
सानपाडा रेल्वे स्टेशनच्या जवळ डी मार्ट आहे. त्या डी मार्ट च्या बाजूलाच हे फायरिंग करण्यात आलेलं आहे. अतिशय वर्दळीचा हा रस्ता आहे, या रस्त्यावरती फायरिंग झाल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. दोन आरोपी होते ते बाईक वरून आले होते. त्यांनी राजाराम ठोकेंवरती फायरिंग केलं. जवळपास पाच ते सहा गोळ्या त्यांनी फायर केल्या होत्या. त्यातल्या दोन-तीन गोळ्या संबंधित व्यक्तीला लागलेल्या आहेत, यामध्ये राजाराम ठोके जखमी झालेले आहेच. त्याची ओळख पटलेली असून खाजगी रुग्णालय मध्ये त्यांना तात्काळ उपचारांसाठी दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार आले आहेत, पोलीस संबंधित घटनेच्या सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. दरम्यान आरोपी ज्या बाजूला गेले त्या ठिकाणचे काही सीसीटीव्ही तपासले जात आहेत, माहिती गोळा केली जात आहे. या घटनेची तात्काळ दखल घेत पोलिसांनी माहिती घ्यायला सुरुवात केली आहे.
हे ही वाचा:
लाचखोर वनक्षेत्रपालाच्या घराची झडती; 57 तोळं सोनं अन् 1 कोटी 31 लाखांची कॅश
“आता खरी मजा आहे”, Manoj Jarange Patil यांची Devendra Fadnavis यांच्यावर टीका
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.