spot_img
Tuesday, January 14, 2025

Latest Posts

आगामी निवडणुकींसाठी मनसे पक्षात होणार नवीन बदल; Sandeep Deshpande यांचे वक्तव्य

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एकही जागा जिंकता आली नाही. त्यामुळे पक्षाच्या कार्यपद्धती आणि पुढील वाटचालीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहेत.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एकही जागा जिंकता आली नाही. त्यामुळे पक्षाच्या कार्यपद्धती आणि पुढील वाटचालीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहेत. तर मनसे ठाकरे गट पुन्हा एकत्र येण्याचीही चर्चांना आता उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर मनसेबाबत मोठी अपडेट समोर आली असून पक्षात मोठे फेरबदल होणार असल्याची माहिती समोर आली आहे. याबतीत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांचे कार्यकर्ते, पदाधिकारी व नेत्यांना नवीन वर्षारच्या शुभेच्छा देताना मागच्या निवडणुकांमध्ये जे झालं ते विसरून पुढे वाटचाल करण्यासंदर्भात आवाहन केले होते. या पार्श्वभूमीवर आज ७ जानेवारीला राज ठाकरेंनी मनसेच्या सर्व विभाग अध्यक्षांची बैठक बोलावली होती. या बैठकीत राज ठाकरेंनी अध्यक्षांना पालिका निवडणुकांसाठी तयारीला लागण्याचे आदेश दिल्याचं सांगितलं जात आहे.

नुकत्याच झालेल्या बैठकीनंतर संदीप देशपांडे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. संदीप देशपांडे म्हणाले की, “आता विधानसभा निवडणुका झाल्या. पण येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांना कशा पद्धतीने सामोरे जायचं यासाठी आज मुंबईच्या सर्व विभाग अध्यक्षांची बैठक बोलावली होती. त्यात सर्व नेतेही उपस्थित होते. येणाऱ्या काही दिवसांत पक्षात पूर्ण रिफॉर्म करण्याचा निर्णय राज ठाकरेंनी घेतला आहे. तो बदल कसा असेल, हे येणाऱ्या काही दिवसांत स्पष्ट होईल. तर बऱ्याच गोष्टींच्या बाबतीत हे बदल झालेले पाहायला मिळतील” असे संदीप देशपांडे म्हणाले.

हे ही वाचा:

शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी राज्य सरकार विरोधात सुप्रियाताईंचा शंकनाद,आंदोलनाला सुरुवात

नवी मुंबई, नागपूर, शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करावीत- CM Devendra Fadnavis

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss