मुंबईमध्ये ड्रग्स तस्करी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. काही वर्षांपूर्वी ड्रग्सच्या गुन्ह्यात सुटलेली शशिकला पाटणकर उर्फ बेबी आंटी हिला पोलिसांनी पुन्हा अटक केली आहे. या आधीसुद्धा बेबी पाटणकर ही जेल मध्ये होती. साथीदाराच्या मदतीने एका व्यापाऱ्याची फसवणूक केली आहे. किरीट चौहान या व्यापाऱ्याची बेबी पाटणकरने दोन कोटींची फसवणूक केली. त्यानंतर बेबी आणि तिच्या साथीदाराला पोलिसांनी अटक केली आहे.
ड्रग्सच्या तस्करीनंतर तिचे हे कारनामे आता समोर आले आहेत. त्यामुळे काहीवर्षांपूर्वी जामिनावर सुटलेल्या बेबीचे कारनामे अजूनही थांबले नाहीत. बेबीने तिच्या साथीदारांच्या मदतीने एका व्यापाऱ्याची दोन कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. किरीट चौहान असे फसवणूक केलेल्या व्यक्तीच नाव आहे. कस्टममध्ये पकडण्यात आलेलं सोनं स्वस्तात देते असे सांगून किरीट चौहान या व्यापाऱ्याची फसवणूक केली. त्यानंतर ६० वर्षीय व्यापाऱ्याने पोलिसात जाऊन बेबी पाटणकर आणि तिच्या साथीदारांची तक्रार केली. किरीट चौहान यांच्या तक्रारी नंतर त्या दोघांनाही अटक केली आणि त्याच्यावर वरळी पोलिसांनी भादवी कलम ४२० आणि ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. परशुराम रामकिसन मुंडे ४५ आणि शशिकला रमेश पाटणकर उर्फ बेबीं पाटणकर या दोघांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांचा पुढील तपास चालू आहे.
किरीट चौहान यांच्या एका ओळखीच्या व्यक्तीने परशुराम मुंडे याच्यांशी भेट करून दिली. त्यानंतर मुंडे यांनी त्याची आर. आर. गोल्ड प्रा. लिमी. नावाची कंपनी पुणे येथे असल्याचं सांगून ते सोनं खरेदी विक्री करतात असे सांगितले. कस्टम येथे पकडलेलं सोनं ते लिलावात कमी भावात खरेदी करून बाजार भावापेक्षा कमी भावात विकतो असे आरोपी परशुराम याने सांगितले. वरळी येथील भिवंडीवाला बिल्डींगमध्ये मुंडे व्यापाऱ्याला बेबी पाटणकरच्या घरी घेऊन गेला. त्यानांतर बेबीने व्यापाऱ्याला ७ किलो सोन दाखवलं. त्यानंतर व्यापाऱ्याने आधी सुमारे एक कोटी ३० लाख रुपये दिले आणि नंतर ७० लाख रूपये दिले. दुसऱ्यादिवशी सोन देतो सांगून देणंही आरोपी पळून गेले. फसवणूक झाल्याचे लक्षत येताच किरीट चौहान याने पोलिसांत तक्रारा केली.
हे ही वाचा:
अजित पवार यांनी केली विरोधकांवर टीका
औरंगाबादकरांनो उद्या घराबाहेर पडण्याआधी पहा हे वाहतुकीचे नियम…