Sunday, May 28, 2023

Latest Posts

आता पुण्यासह मुंबई विद्यापीठाला मिळणार नवे कुलगुरू

मागील आठवड्यात मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी कुलगुरू निवड समितीने मुलाखती घेतल्या होत्या. यातील पाच नावं राज्यपालांकडे पाठवण्यात आली होती.

मागील आठवड्यात मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी कुलगुरू निवड समितीने मुलाखती घेतल्या होत्या. यातील पाच नावं राज्यपालांकडे पाठवण्यात आली होती. त्याआधी पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी देखील ही पद्धत राबवण्यात आली होती. त्यामुळे आता मुंबई (Mumbai University) आणि पुणे विद्यापीठाला (Pune University) कुलगुरू मिळण्याची शक्यता आहे.

मागील आठवड्यात पुणे आणि मुंबई अश्या दोन्ही विद्यापीठाचे कुलगुरूपद हे रिक्त होते. तसेच या पदासाठी अनेक नाव ही चर्चेत होती. यातील २ ते ३ नावांवर निवडीआधीच प्राध्यापक संघटनांकडून आक्षेप घेण्यात आला. त्यामुळे कोणाला कुलगुरुपद मिळतं याकडे सर्वांचं लक्ष हे लागलं आहे. तर मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू निवड प्रक्रियेमध्ये तब्बल ८० जणांनी सहभाग घेतला होता. त्या ८० जनांमधून २० जणांच्या मुलाखती या मागील आठवड्यात निवड समितीने घेतल्या होत्या. या मुलाखतीनंतर ५ जणांची नाव ही राज्यपालांकडे पाठवण्यात आली आहेत. या पाठवण्यात आलेल्या ५ नावांपैकी एक नावाची राज्यपाल रमेश बैस हे कुलुगुरु म्हणून निवड करणार आहेत. तर दुसरीकडे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू निवड समितीने २७ इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. त्यानंतर ५ नावे निश्चित करून राज्यपाल कार्यालयाला पाठवण्यात आली आहेत. तसेच मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांचा कार्यकाळ १० सप्टेंबर २०२२ रोजी संपुष्टात आल्यानंतर हे पद रिक्त झाले होते.

मुंबई विद्यापीठाची संभाव्य नावं

प्रा. रवींद्र कुलकर्णी – मुंबई विद्यापीठाची माजी प्र कुलगुरू म्हणून यांनी काम केला आहे
सुरेश गोसावी – भौतिक शास्त्राचे प्राध्यापक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
तेज प्रताप सिंग – बीएचयु ( बनारस हिंदू विद्यापीठ), राज्यशास्त्राचे प्राध्यापक
ज्योती जाधव – शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर बायोटेक्नॉलॉजी डिपार्टमेंट
अर्चना शर्मा – भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर

पुणे विद्यापीठाची संभाव्य नावं

डॉ. पराग काळकर – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता
प्रा. अविनाश कुंभार – विद्यापीठातील रसायनशास्त्र विभाग
डॉ.संजय ढोले – भौतिकशास्त्र विभाग
प्रा. सुरेश गोसावी – पर्यावरण शास्त्र विभाग
डॉ. विजय फुलारी – कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभाग

हे ही वाचा:

Arvind Kejriwal आले विरोधकांना जोडण्यासाठी, आज घेणार शरद पवारांची भेट

पुण्यात टिंबर मार्केटमध्ये अग्नितांडव, अग्निशमन दलाच्या ३० गाड्या घटनास्थळी

अवघ्या काही तासांत लागणार HSC चा निकाल, विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss